इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील पहिल्या सामन्यात आपल्याला अनेक पराक्रम बघायला मिळाले. त्यात न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज डेवॉन कॉनवेने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह अनेक विक्रम मोडत आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. एकाबाजूने कॉनवेची चर्चा होत असताना दुसऱ्या बाजूने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडचीही बरीच चर्चा आहे. दरम्यान, त्याने रॉस टेलरला बाद करण्यासाठी वापलेली युक्तीने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले होते.
मार्क वूडची रॉस टेलरला बाद करण्यासाठी अनोखी स्किल
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिला कसोटी सामना सुरु असताना रॉस टेलरला बाद करण्यासाठी मार्क वूडने त्याच्या फुटबॉल स्किल्सचा उपयोग केला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे.
झाले असे की मार्क वूड गोलंदाजी करत असताना हेनरी निकोल्स याने जलद एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला व नॉन-स्ट्रायकरवरील त्याचा सोबती रॉस टेलरनेही त्याला साथ दिली. या वेळी रॉस टेलरला धावबाद करण्यासाठी मार्क वूडने चेंडूला लाथ मारत आपल्या फुटबॉल स्किल्सचा उपयोग केला. त्यावेळी त्यानी चेंडूला लाथ मारताना “एस्प्रिला” असा शब्द वापरला व तो स्टंप माइकमध्ये ऐकण्यात आला.
फॉस्टिनो एस्प्रिला हा एक महान फुटबॉलपटू आहे. तो नॉर्थ इस्टसाइड या संघातून खेळतो. मार्क वूडने चेंडूला लाथ मारताना या खेळाडूचे नाव घेतले होते. रॉस टेलरला अशा प्रकारे धावबाद करण्याचा त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांना खूप आवडला आहे व ते त्याला चांगला प्रतिसादही देत आहेत.
https://twitter.com/DN_HY/status/1401497415732056064
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात लॉर्ड्सवर झालेला हा पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. आता या नंतर या दोन्ही संघांमध्ये दुसरा कसोटी सामना हा शुक्रवारपासून खेळवण्यात येईल
ट्रेंट बोल्टचे संघात पुनरागमन
लॉर्ड्स कसोटी सामना अनिर्णित झाल्यानंतर आशा आहे की ट्रेंट बोल्ट हा दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपच्या अंतिम सामन्याच्या तयारीसाठी बोल्टला या सामान्यापेक्षा चांगला सराव मिळणार नाही. वर्ल्ड टेस्ट चॅपियनशिपचा अंतिम सामना हा भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जू रोजी साऊथॅम्प्टन येथे सुरु होईल.
महत्वाच्या बातम्या
कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी युवीने वाचला भारतीय संघासमोरील अडचणींचा पाढा; म्हणाला…
ब्रॉडने षटकार मारत दाखवला धाक, दुसऱ्याच चेंडूवर बोल्ड करत गोलंदाजाने दिले चोख प्रत्युत्तर
कसोटी चॅम्पियनशीप फायनलसाठी विस्डेनने निवडली भारताची प्लेइंग XI, अनुभवी गोलंदाज बाहेर