ऑस्ट्रेलियामध्ये सध्या मार्श कप ही देशांतर्गत वनडे स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत रविवारी(29 सप्टेंबर) व्हिक्टोरिया आणि क्वीन्सलँड या दोन संघांमध्ये मेलबर्नमध्ये सामना पार पडला. या सामन्यात क्वीन्सलँडकडून खेळणाऱ्या मार्नस लॅब्यूशानेच्याबाबतीत एक गमतीशीर घटना घडली.
तो व्हिक्टोरियाचा फलंदाज ख्रिस ट्रेमेनला धावबाद करत असताना त्याची पँट निसटली. पण असे असले तरी लॅब्यूशानेने योग्य थ्रो करताना ट्रेमेनला बाद केले.
झाले असे की, व्हिक्टोरिया संघ 323 धावांचा पाठलाग करत असताना 29 व्या षटकात फलंदाज विल सदरलँडने ट्रेमेनसह एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण याचवेळी क्षेत्ररक्षक लॅब्यूशानेने चेंडू पकडत यष्टीरक्षकाकडे फेकला. यष्टीरक्षकानेही चेंडू योग्य झेलत ट्रेमेनला बाद केले. मात्र चेंडू पकडताना लॅब्यूशानेची पँट निसटली. त्यामुळे त्याच्यासह सर्वांनाच हसू आवरता आले नाही.
Pants down, no problems! Marnus Labuschagne with some elite fielding for @qldcricket
Follow: https://t.co/0p1vTjKTa0 #MarshCup pic.twitter.com/642uZUgt0Y
— cricket.com.au (@cricketcomau) September 29, 2019
या सामन्यात क्वीन्सलँडचा कर्णधार उस्मान ख्वाजाने 126 चेंडूत 16 चौकार आणि 1 षटकारासह सर्वाधिक 138 धावा काढल्या. तसेच सॅम हिजलेटने 88 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे क्वीन्सलँडला 50 षटकात 9 बाद 322 धावांपर्यंत मजल मारता आली. व्हिक्टोरियाकडून जेम्स पॅटिन्सनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर 323 धावांचा पाठलाग करताना व्हिक्टोरिया संघाला 39.5 षटकात सर्वबाद 168 धावाच करता आल्या. त्यांच्याकडून विल सदरलँडने सर्वाधिक 66 धावांची खेळी केली. तर क्वीन्सलँडकडून मार्क स्टिकेटीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–जेव्हा एकाच सामन्याच्या टॉससाठी चक्क ३ खेळाडू उपस्थित राहतात, पहा व्हिडिओ
–रोहित शर्मा- मयंक अगरवाल मैदानात उतरताच ४७ वर्षांनंतर पहिल्यांदाच घडणार ही गोष्ट
–का केले नरेंद्र मोदींनी नदालविरुद्ध हरलेल्या या रशियन टेनिसपटूचे एवढे भरभरुन कौतुक?