Loading...

…तर कोहलीची टीम इंडिया भारतात करणार ‘विराट’ विश्वविक्रम

विशाखापट्टणम। बुधवारपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना बुधवारपासून विशाखापट्टणम येथे सुरु होईल.

यावर्षातील भारताची मायदेशात ही पहिलीच कसोटी मालिका आहे. भारताने याआधी मायदेशात शेवटची कसोटी मालिका ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध खेळली आहे. या मालिकेत भारताने 2-0 असा विजय मिळवला होता.

तसेच वेस्ट इंडीज विरुद्ध मिळवलेला हा मालिका विजय भारताचा मायदेशातील सलग 10 वा कसोटी मालिका विजय होता.

त्यामुळे बुधवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत जर भारतीय संघाने विजय मिळवला तर हा भारताचा मायदेशातील सलग 11 वा कसोटी मालिका विजय असेल.

याबरोबरच भारतीय संघ मोठा इतिहासही घडवेल. याआधी कोणत्याही संघाला मायदेशात सलग 10 पेक्षा अधिक कसोटी मालिका विजय मिळवला आलेले नाही. त्यामुळे भारताला मायदेशात सलग 11 कसोटी मालिका विजय मिळवणारा पहिला संघ होण्याची संधी आहे.

Loading...

सध्या मायदेशात सर्वाधिक सलग कसोटी मालिका विजय मिळवण्याचा विक्रम भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या नावावर संयुक्तरित्या आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने दोन वेळा मायदेशात सलग 10 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

ऑस्ट्रेलियाने स्टिव्ह वॉ आणि मार्क टेलर यांच्या नेतृत्वाखाली नोव्हेंबर 1994 ते नोव्हेंबर 2000 दरम्यान पहिल्यांदा सलग 10 कसोटी मालिका मायदेशात जिंकल्या होत्या. त्यानंतर रिकी पॉटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने जूलै 2004 ते नोव्हेंबर 2008 दरम्यान दुसऱ्यांदा मायदेशात सलग 10 कसोटी मालिका जिंकण्याचा कारनामा केला.

यानंतर सध्या भारताने फेब्रुवारी 2013 पासून आत्तापर्यंत मायदेशात सलग 10 कसोटी मालिका जिंकल्या आहेत.

मायदेशात सर्वाधिक सलग कसोटी मालिका विजय मिळवणारे संघ –

Loading...

10* – भारत (फेब्रुवारी 2013 – आत्तापर्यंत)

10 – ऑस्ट्रेलिया (नोव्हेंबर 1994 – नोव्हेंबर 2000)

10 – ऑस्ट्रेलिया (जूलै 2004 – नोव्हेंबर 2008)

8 – वेस्ट इंडीज (मार्च 1976 – फेब्रुवारी 1986)

Loading...

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

पहा व्हिडिओ: मार्नस लॅब्यूशानेने पँट निसटल्यानंतरही केले अफलातून धावबाद

जेव्हा एकाच सामन्याच्या टॉससाठी चक्क ३ खेळाडू उपस्थित राहतात, पहा व्हिडिओ

रोहित शर्मा- मयंक अगरवाल मैदानात उतरताच ४७ वर्षांनंतर पहिल्यांदाच घडणार ही गोष्ट

Loading...
You might also like
Loading...