---Advertisement---

टीम इंडियाविरुद्ध भन्नाट कामगिरी करण्यास लॅब्यूशाने सज्ज; विराटकडूनच घेतोय प्रेरणा

On: शनिवार, जानेवारी 11, 2020 1:54 PM
---Advertisement---

14 जानेवारीपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 3 सामन्यांची वनडे (ODI Series) मालिका सुरु होणार आहे. यातील पहिला सामना (First ODI Match) मुंबई (Mumbai) येथे पार पडणार आहे. या मालिकेसाठी काल ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल झाला आहे.

यावेळी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅब्यूशानेने (Marnus Labuschagne) मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकाराबद्दल आपले मत व्यक्त केले.

अनेक वर्षांपासून सर्वच क्रिकेट प्रकारात सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणे हे माझे लक्ष आहे, असे लॅब्यूशाने म्हणाला.

“तुम्ही त्या खेळाडूंना पहा ज्यांच्याकडून मी प्रेरणा घेतो. त्यामध्ये स्टीव्ह स्मिथ (Steve Smith), विराट कोहली (Virat Kohli), केन विलियमसन (Kane Williamson) आणि जो रूट (Joe Root) या खेळाडू्ंचा समावेश आहे.”

“हे सर्व खेळाडू मागील 5-6 वर्षांपासून एक आणि त्यापेक्षा जास्त क्रिकेट प्रकारात चांगली कामगिरी करत आहेत,” असे ईएसपीएनक्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत लॅब्यूशाने म्हणाला.

“या उन्हाळ्यात मी काही प्रमाणात चांगली कामगिरी केली आहे. परंतु माझ्यापुढे अनेक आव्हाने आहेत. तसेच चांगली कामगिरी करत अधिक धावादेखील करायच्या आहेत. जर मी सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत राहिलो तर वनडे माझ्यासाठी नक्कीच मोठे आव्हान असेल,” असेही लॅब्यूशाने यावेळी म्हणाला.

लॅब्यूशाने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळणार आहे. त्याने आतापर्यंत फक्त कसोटी क्रिकेट खेळले आहे. आता तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कशाप्रकारे कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---