ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत न्यूझीलंडने ३-२ अशा फरकाने विजय मिळवत मालिका आपल्या नावे केली. मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पुनरागमन करत पुढील दोन सामने जिंकले होते. मात्र, अखेरच्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने त्यांना ७ गड्यांनी पराभूत केले. आक्रमक ७१ धावांची खेळी करणारा न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल सामनावीर ठरला.
गुप्टीलने केली झंपाची धूलाई
या सामन्यात ७१ धावांची खेळी करणाऱ्या मार्टीन गप्टीलने ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ऍडम झंपाची चांगलीच धुलाई केली. झंपाने टाकलेल्या नवव्या षटकात त्याने तीन षटकार व एक चौकार ठोकला. यादरम्यान त्याने इतका जबरदस्त षटकार की त्याच्या षटकाराचा चेंडू थेट स्टेडियमच्या छतावर पोहोचला.
आयसीसीने त्याच्या दमदार षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.
न्यूझीलंडचा शानदार विजय
कोरोना महामारीनंतरऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्या दरम्यान प्रथमच मालिका खेळली जात होती. पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यजमान न्यूझीलंडने चांगली सुरुवात केली. मात्र, पाहुणे ऑस्ट्रेलियाने पुढील दोन सामने जिंकताना अखेरच्या सामन्याचे महत्त्व वाढवले. वेलिंग्टन येथील सामन्याने या मालिकेतील विजेता ठरणार होता.
ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिला गडी लवकर बाद झाल्यानंतर फिंच व यष्टीरक्षक मॅथ्यू वेड यांनी दुसऱ्या गड्यासाठी ६६ धावा जोडून संघाला सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने नेले. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अत्यंत नियंत्रित मारा करत ऑस्ट्रेलियाचा डाव १४२ धावांपर्यंत मर्यादित ठेवला. न्यूझीलंडकडून लेगस्पिनर ईश सोढीने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
It’s on the roof 🚀@Martyguptill is putting on a clinic.#NZvAUS | https://t.co/nU0Cro1Zuvhttps://t.co/epd8wAKpPZ
— ICC (@ICC) March 7, 2021
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १४३ भावांच्या आव्हानासमोर या मालिकेत तुफान फॉर्ममध्ये असणारे न्यूझीलंडचे सलामीवीर डेवॉन कॉनवे व अनुभवी मार्टिन गप्टिल यांनी संघाला ताबडतोब सुरुवात दिली. दोघांनी सामना एकतर्फी करताना अवघ्या १२ षटकांमध्ये १०६ धावा जोडल्या. कॉनवे व कर्णधार केन विलयम्सन लागोपाठच्या चेंडूवर बाद झाल्यानंतर ही गप्टीलने फटकेबाजी सुरू ठेवली. अखेरीस, ४६ चेंडूमध्ये ७१ धावा काढून तो बाद झाला. त्याने आपल्या खेळीदरम्यान ७ चौकार व ४ उत्तुंग षटकार ठोकले. ग्लेन फिलिप्स व मार्क चॅपमन यांनी न्यूझीलंडच्या विजयाची पूर्तता केली. गुप्टिलला सामनावीर तर मालिकेत सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या ईश सोढीला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
४६ वर्षीय शाहिद आफ्रिदीच्या मुलीचा ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरबरोबर साखरपुडा
‘ही’ आहे जसप्रीत बुमराहची वाग्दत्त वधू? स्पोर्ट्स अँकर म्हणून आहे प्रसिद्ध
चौथ्या कसोटीत का झाला इंग्लंडचा दारुण पराभव? ‘ही’ आहेत प्रमुख कारणे