---Advertisement---

आयपीएल २०१९: असे आहेत कोलकता-हैद्राबादचे ११ जणांचे संघ

On: रविवार, मार्च 24, 2019 3:55 PM
---Advertisement---

कोलकता। आयपीएल 2019 मध्ये आज दुसरा सामना कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात होणार आहे.  हा सामना इडन गार्डन स्टेडियम, कोलकता येथे होणार आहे.

या सामन्यात कोलकता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

तसेच या सामन्यासाठी आज सनरायझर्स हैद्राबाद संघाचे नेतृत्व भुवनेश्वर कुमारकडे सोपवण्यात आले आहे. कारण हैद्राबाद संघाचा नियमित कर्णधार केन विलियमसन खांद्याच्या दुखापतीमुळे या सामन्याला मुकणार आहे.

भुवनेश्वरचा कर्णधार म्हणून आयपीएलचा पहिलाच सामना आहे. या सामन्यासाठी हैद्राबाद संघात डेव्हिड वॉर्नर, शाकिब अल हसन, जॉनी बेअरस्टो आणि राशीद खान या परदेशी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तसेच वॉर्नर एक वर्षांनंतर आयपीएलमध्ये आज पूनरागमन करणार आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

कोलकता संघाने ख्रिस लीन, सुनील नारायण, आंद्रे रसल आणि लॉकी फर्ग्युसन या परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. त्याचबरोबर आज कोलकता संघाकडून फर्ग्युसन तर हैद्राबाद संघाकडून जॉनी बेअरस्टो पदार्पण करत आहेत.

असे आहेत 11 जणांचे संघ-

कोलकता नाईट रायडर्स – ख्रिस लिन, सुनील नारायण, रॉबिन उथप्पा, शुबमन गिल, नितीश राणा, दिनेश कार्तिक (कर्णधार), आंद्रे रसेल, पियुष चावला, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, प्रसिद्ध कृष्णा

सनरायझर्स हैद्राबाद-  डेव्हिड वार्नर, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, दीपक हुडा, शाकिब अल हसन, विजय शंकर, यूसुफ पठान, राशीद खान, भुवनेश्वर कुमार (कर्णधार), संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल इतिहासात असा पराक्रम करणारा सुरेश रैना ठरला पहिलाच खेळाडू

त्यानंतर यॉर्कर किंग लसिथ मलिंगा घेणार क्रिकेटमधून निवृत्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment