---Advertisement---

दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर अख्ख्या श्रीलंका संघाला ठोठावण्यात आला दंड, ‘हे’ आहे कारण

On: शुक्रवार, जुलै 23, 2021 12:05 AM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला गेला. त्या सामन्यात भारतीय संघाने ३ विकेट्सने विजय मिळवत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. मात्र, आयसीसी एमिरेट्सच्या एलिट पॅनेलचे मॅच रेफ्री रंजन मदुगले यांनी दसून शनाकाच्या नेतृत्वातील श्रीलंका संघाला निर्धारित वेळेत एक षटक कमी गोलंदाजी केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. यासाठी आयसीसीने श्रीलंकेच्या संघाला सामना शुल्काच्या २० टक्के दंड ठोठावला.

काय सांगतो नियम?
आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार, सर्व खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी यांना निर्धारित वेळेत गोलंदाजीच्या प्रत्येक षटकांसाठी सामना शुल्कापैकी किमान २० टक्के दंड ठोठावते.

या नियमानुसार आंतरराष्ट्रीय सामन्यात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला निर्धारित वेळेत सर्व षटके गोलंदाजी करावी लागते. जर संघ असे करण्यास अपयशी ठरला तर, सर्व खेळाडू आणि सहयोगी स्टाफ सदस्यांना दंड आकारला जातो.

इतकेच नव्हे तर आयसीसी पुरुषांच्या विश्वचषक सुपर लीग अंतर्गत या मालिकेच्या नवीन नियमांच्या कलम १६.२.२ नुसार, स्लो ओव्हर रेटखाली दोषी आढळल्यास यजमान संघाला एक गुण दंड ठोठावण्यात येतो. याचा अर्थ असा की, आयसीसीच्या वनडे सुपर लीग अंतर्गत श्रीलंका संघाच्या एकूण गुणांमधून एक गुण वजा केला जाईल.

श्रीलंका संघाने स्वीकारली चूक
श्रीलंकेच्या संघाने चूक स्वीकारत शिक्षा मान्य केली आहे. यामुळे आता अधिक सुनावणीची आवश्यकता नाही. भारत-श्रीलंका यांतील दुसर्‍या सामन्यात मैदानावरील पंच कुमार धर्मसेना आणि लिंडन हॅनिबल, तिसरे पंच रुचिरा पल्लियागुरुगे आणि चौथे पंच प्रगट रामबुवेला यांनी हे आरोप ठेवले होते. भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी आघाडी घेतली असून, मालिकेतील शेवटचा सामना २३ जुलै रोजी खेळला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बाजीगर रिषभ! कोरोनावर मात करून परतल्यानंतर टीम इंडियाने पंतचे असे केले ‘ग्रँड वेलकम’, पाहा फोटो

रवी शास्त्री यांच्याऐवजी द्रविडकडे द्यायला हवे का भारताचे प्रशिक्षकपद? माजी क्रिकेटरने दिले ‘हे’ उत्तर

‘गोलंदाजी करताना तो लयीत दिसत नाही’, हार्दिकच्या तंदुरुस्तीवर माजी भारतीय क्रिकेटरने उपस्थितीत केले प्रश्न

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---