रविवार, १ जुलैला फिफा विश्वचषकात झालेल्या बाद फेरीच्या सामन्यात बलाढ्य स्पेनला पराभूत करत यजमान रशियाने उपांत्य पूर्व फेरी गाठली.
स्पेन-रशिया यांच्यातील बाद फेरीचा सामना निर्धारीत वेळेत १-१ अशा बरोबरीत सुटल्याने फिफा विश्वचषक २०१८ मधील पहिल्या पेनाल्टी शूटआउटमध्ये रशियाने ४-३ अशा फरकाने स्पेनला पराभूत करत घरचा रस्ता दाखवला.
या विजयाबरोबरच रशिया १९७० नंतर प्रथमच फिफा विश्वचषकाच्या उपांत्या फेरीत स्थान मिळवण्यासाठी यशस्वी झाली आहे.
सामन्याच्या १० व्या मिनिटाला रशियाने ओन गोर करत स्पेनला आघाडी मिळवून दिली. त्यानंर ३६ व्या मिनिटापर्यंत स्पेनने आक्रमक खेळ करत बॉलचा ताबा आपल्याकडे राखला.
मात्र ४० व्या मिनिटाला रशियाच्या अर्टम झुबाने पेनाल्टी किकवर गोल करत रशियाला या सामन्यात १-१ अशी बरोबरी साधुन दिली.
पहिल्या हाफमध्ये १-१ अशा बरोबरीत राहिलेल्या सामन्यात स्पेनने दुसऱ्या हाफमध्ये जारदार आक्रमण करत गोल करण्याचा प्रयत्न केला. पण यजमान रशियानेदेखिल चिवट खेळ करत स्पेनला जेरीस आणले.
८५ व्या मिनिटाला स्पेनच्या इनिस्ताला गोल करण्याची संधी चालून आली होती मात्र रशियाच्या अकिनफीवने आपल्या उजव्या बाजूला झूकत अप्रतिम गोलरक्षन केले.
त्यानंतर पेनाल्टी शूटआउट मध्ये गेलेल्या या सामन्यात पूर्णपणे रशियाचा कर्णधार आणि गोलरक्षक अकिनफीवचे वर्चस्व राहिले. त्याने दोन गोल सेव्ह करत रशियाला ४-३ असा विजय मिळवून दिला.
पेनाल्टी शूटआउटमध्ये रशियाकडून सोमोलोव, इग्नाशेविच, गोलोविन आणि चेरीशेवने गोल केले तर स्पेनकडून इस्को, पिक आणि कप्तान रामोसने गोल केले.
उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात आता रशियाला शनिवार, ७ जुलैला क्रोएशिया विरुद्ध लढत द्यावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-टीम इंडियामध्येही दिसणार पंड्या ब्रदर्स
-टॉप ५: वनडेत सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू