ऑस्ट्रेलिया संघाने शनिवारी (दि. 11 नोव्हेंबर) पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर बांगलादेशविरुद्ध 8 विकेट्सने विजय मिळवला. विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 43व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ मिचेल मार्श याच्या जोरावर विजयी झाला. मार्शने या विश्वचषकात ऑस्ट्रेलियासाठी दुसरी सर्वात मोठी वैयक्तिक खेळी केली. त्याला या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार जिंकल्यानंतर त्याने खळबळजनक प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाला मार्श?
सामनावीर पुरस्कार पटकावताच मिचेल मार्श (Mitchell Marsh) याने आपल्या विधानाने सर्वांना हसवले. तो म्हणाला की, “दरदिवशी 4 षटकात 50 धावा खर्च केल्यानंतर तुम्हाला सामनावीर पुरस्कार मिळत नाही.” पुढे बोलताना मार्श म्हणाला, “खूप चांगले वाटत आहे. मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करणे चांगली बाब आहे. आता आमचे लक्ष उपांत्य सामन्यावर लागले आहे. जेव्हा ट्रेविस हेड तंबूत परतत होता, तेव्हा मला माहिती होते की, फलंदाजीसाठी जायचे आहे. मजबूतीने खेळणे आणि स्वत:वर विश्वास ठेवणे गरजेचे होते. काही सामने गमावले, पण मी खुश आहे की, पुन्हा हे करू शकलो. तुम्ही अनेकदा अपयशी व्हाल, पण गरजेचे आहे की, अनेकदा योग्य करून दाखवाल.”
आपल्या कुटुंबाविषयी बोलताना मार्श म्हणाला, “मला विश्वास आहे की, माझे आजी आणि आजोबा सर्वजण घरी सामने पाहत असतील. आशा आहे की, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असेल. माझे आजोबा खूप चांगले व्यक्त होते आणि आम्ही त्यांच्या आयुष्याचा जल्लोषही केला. मी आनंदी आहे की, आपल्या कुटुंबासाठी असे प्रदर्शन करू शकलो आणि विजय मिळवला.”
मिचेल मार्शने उपांत्य फेरीविषयी बोलताना म्हटले की, “आता प्रतीक्षा करू शकत नाही. हा शानदार सामना असेल. उपांत्य फेरीत चार सर्वोत्तम संघ खेळतील आणि मी कोलकातामध्ये सामना खेळण्यासाठी खूपच उत्सुक आहे.”
मार्शचा झंझावात
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकत बांगलादेशला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावत 306 धावा केल्या. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 44.4 षटकात 2 विकेट्स गमावत पार केले. ऑस्ट्रेलियाकडून यावेळी मिचेल मार्श चमकला. त्याने 132 चेंडूंचा सामना करताना सर्वाधिक नाबाद 177 धावा केल्या. त्याच्या खेळीत 9 षटकार आणि 17 चौकारांचा समावेश होता. (match winner mitchell marsh on winning potm award after concede 50 runs in four overs aus vs ban world cup 2023)
हेही वाचा-
सेमीफायनलचा पत्ता कट होताच इंग्लंड ‘या’ देशाविरुद्ध खेळणार वनडे अन् टी20 मालिका; संघ घोषित, पण कर्णधार कोण?
ऑस्ट्रेलियाच्या विक्रमी विजयानंतर कमिन्सचे जबरदस्त विधान; सेमीफायनलमधील ‘या’ डोकेदुखीविषयी स्पष्टच बोलला