---Advertisement---

मोठी बातमी! चेन्नई संघात नव्या भिडूची एन्ट्री, ‘हा’ १९ वर्षीय खेळाडू घेणार ऍडम मिल्नेची जागा

On: गुरूवार, एप्रिल 21, 2022 2:45 PM
Chennai-Super-Kings
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघ विजयी लय मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. त्यातच संघाला सुरुवातीलाच दोन मोठे धक्के बसले, ते म्हणजे ऍडम मिल्ने आणि दीपक चाहर हो दोघे दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर गेले. पण आता, चेन्नईने ऍडम मिल्नेचा बदली खेळाडू म्हणून श्रीलंकेच्या १९ वर्षीय खेळाडूला आपल्या संघात जोडले आहे, तो खेळाडू म्हणजे माथिशा पाथीराणा आहे. 

ऍडम मिल्ने (Adam Milne) या हंगामात सहभागी होण्यासाठी भारतात आला होता, पण चेन्नईकडून कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा पहिलाच सामना खेळताना त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. परिणामी त्याला उर्वरित संपूर्ण आयपीएल २०२२ हंगामातून बाहेर व्हावे लागले. आता त्याचा बदली खेळाडू (replacement player) म्हणून मथिशा पाथीराणा (Matheesha Pathirana) चेन्नई संघात (Chennai Super Kings) दाखल होणार आहे.

मथिशा पाथीराणा हा श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज आहे. त्याने २०२० साली झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात श्रीलंका संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याला चेन्नईने २० लाखांच्या किंमतीत संघात दाखल करून घेतले आहे. मथिशाने आत्तापर्यंत २ टी२० सामने खेळले आहेत, तसेच १ अ दर्जाचा सामना खेळला आहे. यात त्याने २ विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, चेन्नईने अजून दीपक चाहरच्या (Deepak Chahar) बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही. चाहर आयपीएल २०२२ (IPL 2022) सुरू होण्यापूर्वीच दुखापतग्रस्त होता, त्यामुळे तो बंगळुरूमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये होता. मात्र, यादरम्यान त्याच्या पाठीच्या दुखापतीनेही उचल खाल्ल्याने त्याला आयपीएलच्या संपूर्ण हंगामातून बाहेर व्हावे लागले आहे.

चेन्नईची कामगिरी
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) आत्तापर्यंत ६ सामने खेळले असून ५ सामने पराभूत झाले असून एकच सामना जिंकण्यात त्यांना यश मिळाले आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

‘एल क्लासिको’ सामन्यात ब्रावो ठरणार चेन्नईसाठी गेमचेंजर? मुंबईच्या ‘या’ ३ फलंदाजांना गुडघे टेकायला पाडतो भाग

IPL2022| चेन्नई वि. मुंबई सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

कोरोना संकटानंतरही विजय मिळवल्यावर पंतची लक्षवेधी प्रतिक्रिया, तर मयंकनेही सांगितले पराभवाचे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---