क्रिकेटविश्वात नेहमीच तरुण क्रिकेटपटू दिग्गज क्रिकेटपटूंचा आदर्श पुढे ठेवून त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा काही युवा शिलेदारांच्या शैलीत दिग्गज क्रिकेटपटूंच्या शैलीची झलकही पाहायला मिळते. श्रीलंकेचा माजी अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा (Lasith Malinga) याची भीती तर आजही भल्याभल्या फलंदाजांच्या मनात घर करून असेल. गतवर्षी मलिंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. परंतु त्याच्या अनुपस्थितीतही फलंदाजांना भविष्यात त्याच्या भेदक गोलंदाजीचा सामना करावा लागू शकतो. कारण आता मलिंगाची कमतरता भरून काढण्यासाठी ‘मिनी मलिंगा‘ (Mini Malinga) सज्ज झाला आहे.
वेस्ट इंडिजमध्ये सध्या १९ वर्षांखालील विश्वचषक (U19 World Cup) सुरू आहे. या विश्वचषकात श्रीलंकेच्या एका गोलंदाजांने सर्वांचेच लक्ष वेधले आहेत. त्या गोलंदाजाचे नाव मथीशा पथिराना (Matheesha Pathirana) असून त्याची गोलंदाजी शैली हुबेहूब मलिंगासारखी आहे. त्याची साईड आर्म ऍक्शन गोलंदाजी पाहून तर सर्वांना मलिंगाची आठवण झाल्यावाचून राहणार नाही. अगदी प्रसिद्ध क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा(Aakash Chopra) देखील मथीशाची गोलंदाजी पाहून थक्क झाला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलनेही (आयसीसी) या मिनी मलिंगाची दखल घेतली आहे. आयसीसीने इंस्टाग्रामवर मथीशाच्या गोलंदाजीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावर कॅप्शन देत त्याने लिहिले आहे की, मिनी मलिंगाने जगाला त्याला नोटिस करायला भाग पाडले आहे.
https://www.instagram.com/reel/CZN9X06FSwo/?utm_source=ig_web_copy_link
माजी भारतीय सलामीवीर आकाश चोप्रा यानेही मथीशाचा नेट्समध्ये गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ पाहून त्याचे कौतुक केले आहे. ‘अरे बाबा, स्लिंगा मलिंगा. गोलंदाजी शैलीसुद्धा तीच, वेगसुद्धा तोच. श्रीलंका कमालीचा देश आहे. येथून एक नवा हिरा क्रिकेटमध्ये आला आहे,’ असे त्याने आपल्या व्हिडिओत म्हटले आहे. त्याच्या बोलण्यावरून मथीशाची पाहून तो आश्चर्यचकित झाला असल्याचे दिसत आहे.
https://www.instagram.com/reel/CZOIF7YFa37/?utm_source=ig_web_copy_link
मथीशाने १९ वर्षांखालील विश्वचषकात भारताविरुद्धच्या सामन्यात यशस्वी जयस्वालला त्रिफळाचीत केले होते. गतवर्षी त्याला आयपीएलमधील दुसरी सर्वात यशस्वी फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जने राखीव खेळाडू म्हणून संघात सहभागी केले होते. त्यामुळे हळूहळू आपल्या भेदक गोलंदाजीने अनेकांना भुरळ पाडणारा मथीशा लवकरच श्रीलंका संघाकडून खेळताना दिसेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘लखनऊ संघाचे माझ्यासाठी किती बजेट?’, शार्दुलने विचारलेल्या प्रश्नावर केएल राहुलने दिले ‘हे’ उत्तर
अन् स्टिव्ह स्मिथने स्वत:वरच मीम बनवत नामकरणही केले, ‘त्या’ इंस्टाग्राम पोस्टमागचा हेतू तरी काय?
हेही पाहा-