---Advertisement---

दुर्दैवच अजून काय! पदार्पणात द्विशतक ठोकणारा ‘हा’ किवी फलंदाज जगतोय हलाखीचे आयुष्य

On: रविवार, जून 6, 2021 3:50 PM
---Advertisement---

इंग्लंडविरुद्ध पदार्पणाच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज डेवॉन कॉनवेने द्विशतक ठोकून शानदार कामगिरीची नोंद केली. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणारा कॉनवे दुसरा किवी फलंदाज ठरला आहे. कॉनवेपूर्वी मॅथ्यू सिन्क्लेअर असा न्यूझीलंडचा फलंदाज होता ज्याने पदार्पण कसोटीत द्विशतक झळकाविण्याचे आश्चर्यकारक काम केले होते. या डावात सिन्क्लेअरने २०१४ धावा केल्या होत्या. तर, कॉनवेने लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध २०० धावा बनविल्या. पदार्पणात अप्रतिम खेळी करून कॉनवे प्रसिद्धीझोतात आला, तर दुसरीकडे न्यूझीलंडकडून अशी कामगिरी केलेला पहिला फलंदाज मॅथ्यू सिन्क्लेअर आता हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे.

सध्या जगतोय गरिबीत जीवन
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, सिन्क्लेअरचे आयुष्य खूप कठीण जात आहे. क्रिकेटपासून दूर झाल्यानंतर सिन्क्लेअरला कोणतीही खात्रीलायक नोकरी मिळाली नाही आणि सध्या तो आर्थिक संकटात असून सर्वसामान्य आयुष्य व्यतीत करत आहे. न्यूझीलंड संघाचा हा माजी फलंदाज सध्या एका इस्टेट कंपनीत कार्यरत असून सिन्क्लेअरची पत्नीही त्याच्यापासून विभक्त राहते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वी तो एका शाळेत क्रिकेट कोचिंग देताना दिसलेला.

अशी राहिली कारकीर्द
ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या परंतु न्यूझीलंडसाठी क्रिकेट खेळलेल्या मॅथ्यू सिन्क्लेअरने आपल्या कसोटी कारकीर्दीत ३३ सामने खेळले आहेत आणि या काळात त्याने १६३५ धावा केल्या. त्याच्या नावावर ३ शतके आहेत. कसोटी व्यतिरिक्त, सिन्क्लेअर न्यूझीलंडकडून वनडे क्रिकेट देखील खेळला आहे. सिन्क्लेअरने आपल्या कारकीर्दीत ५४ वनडे सामने खेळले आणि १३०४ धावा केल्या.

वनडे सामन्यांत या फलंदाजाच्या नावे २ शतके आणि ८ अर्धशतकांची नोंद आहे. १९९९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध न्यूझीलंडसाठी सिन्क्लेअरने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो २००९ मध्ये आपला शेवटचा कसोटी सामना खेळला. २०१३ मध्ये अधिकृतरीत्या त्याने निवृत्तीची घोषणा केली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

प्रवीण कुमारने शेअर केला सहकाऱ्यांसोबतचा जुना फोटो; चाहते म्हणाले, ‘वो दिन भी क्या दिन थे’!

ऑसी दिग्गजाने अश्विनला म्हटले सर्वश्रेष्ठ गोलंदाज, पण माजी भारतीय क्रिकेटरला नाही पचली स्तुती!

‘कोहली-विलियम्सनच्या नेतृत्त्वात मोठे अंतर, WTC फायनलमध्ये दोघांची अग्निपरिक्षा,’ माजी प्रशिक्षकाचे मत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---