Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हेन्री-एजाजने पाडल्या पाकच्या मर्यादा उघड्या! दहाव्या गड्यासाठी केली ‘झुंजार’ शतकी भागीदारी

January 3, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/Blackcaps

Photo Courtesy: Twitter/Blackcaps


सध्या न्यूझीलंड संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. अभय संघांमध्ये कराची येथे दुसरा कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचे दहाव्या आणि अकराव्या क्रमांकाचे फलंदाज मॅट हेन्री आणि एजाज पटेल यांनी पाकिस्तानी गोलंदाजांच्या मर्यादा उघड्या पाडत शतकी भागीदारी केली. त्यांच्या योगदानामुळे न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 449 धावा उभारल्या.

पहिली कसोटी नाट्यमयरित्या राहिल्यानंतर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी केली. डेवॉन कॉनवे याचे शतक आणि टॉम लॅथम याच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या दिवसाखेर 6 बाद 309 अशी मजल मारलेली. दुसऱ्या दिवशीही पाकिस्तानच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करताना तीन गडी अवघ्या 36 धावांवर गमावले. त्यामुळे पाकिस्तानला न्यूझीलंडचा डाव 350 पेक्षा कमी धावात रोखण्याची संधी होती.

पाकिस्तानी संघाचा हा मनसुबा मॅट हेन्री आणि एजाज पटेल यांनी उधळून लावला. हेन्रीने अक्षरशा पाकिस्तानी गोलंदाजावर आक्रमण करत पटापट धावसंख्या वाढवली. त्याला पटेल याने तितकीच संयमी साथ दिली. हळूहळू वाढत असलेली धावसंख्या त्यांनी 400 पार नेली. यादरम्यान हेन्रीने आपल्या कसोटी कारकीर्दीतील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. अखेर एजाज 35 धावांवर बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा डाव 449 धावांवर संपुष्टात आला.‌ हेन्री 81 चेंडूवर 8 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 68 धावांवर नाबाद राहिला.

कराची येथील दहाव्या गड्यासाठी झालेली ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. यापूर्वी फ्रॅंक कॅमरून व‌ बेवन कोंगडोन यांनी 1965 मध्ये 63 धावांची भागीदारी केली होती. तर, पाकिस्तानचे इंजमाम उल हक व मुश्ताक अहमद यांनी 1994 मध्ये 57 धावांची भागीदारी केलेली.

(Matt Henry And Ajaz Patel Century Stand For 10th Wicket In Karachi Test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

हाच कॉन्फिडन्स हवा! मालिकेआधीच हार्दिक म्हणतोय, “स्लेजिंगची काय गरज? आम्हाला बघूनच त्यांची…”
बाबर-रिझवानची पाकिस्तान संघातून होणार हकालपट्टी? आफ्रिदीने सुरू केली तयारी


Next Post
Sryakumar Yadav

सूर्या श्रीलंकन फलंदाजांची करणार धुलाई! नेट्समध्ये खेळले एकापेक्षा एक शॉट्स

Pakistani Cricket Team

"आमची निवडसमिती आणि टीम मॅनेजमेंट थर्ड क्लास", पाकिस्तानी दिग्गज बरसला

Virat-Kohli

आईसलँडवाल्यांची एवढी हिम्मत! 'किंग' कोहलीचा खुलेआम अपमान

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143