गुरुवारी (दि. 9 फेब्रुवारी) नागपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvAUS) संघात पहिला कसोटी सामना सुरू झाला. यादरम्यान भारतीय संघाने पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवत सामना जिंकण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. ऑस्ट्रेलियन संघ सामन्यात माघारलेला असतानाच आणखी एक धक्का बसला आहे.
ऑस्ट्रेलियन संघ सामन्याच्या पहिल्या दिवशी केवळ 177 धावांवर सर्वबाद झाला. रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्विन यांनी भेदक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला. ऑस्ट्रेलियन संघाने या सामन्यात युवा फलंदाज मॅट रेनशॉ याला संधी दिली होती. मात्र, रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर तो पहिल्याच चेंडूवर माघारी परतला.
ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत असतानाच आता त्यांच्यासाठी एक वाईट बातमी समोर येताना दिसते. कारण, दुसऱ्या दिवशी सामना सुरू होण्याआधी रेनशॉ दुखापतग्रस्त झाला आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ वॉर्म अप करत होता. त्यावेळी रेनशॉ याच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. त्याची दुखापत किती गंभीर आहे याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्याच्या अनुपस्थितीत बदली क्षेत्ररक्षक म्हणून एश्टन एगर याला ऑस्ट्रेलियन संघाने मैदानात उतरवले.
रेनशॉ याला अष्टपैलू कॅमेरून ग्रीन याच्या जागी संघात स्थान मिळाले आहे. ग्रीन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत झालेल्या दुखापतीतून अद्याप सावरला नाही. रेनशॉ याला संघात स्थान दिल्याने काही माजी क्रिकेटपटूंनी ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनावर टीका केलेली. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकाचा फलंदाज असलेला ट्रेविस हेड याला बाहेर बसवल्याने ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी नाराजी व्यक्त केली होती.
(Matt Renshaw Injured Before Nagpur Test Day 2 In Warm Up)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नागपूर कसोटीच्या खेळपट्टीविषयी जडेजाची मोठी प्रतिक्रिया, ऑस्ट्रेलियन स्पिनर्सलाही दिला खास सल्ला
IND vs AUS : कसोटी सामन्यात विराटकडून मोठी चूक, ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणाला…