भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (28 नोव्हेंबर) खेळला गेला. गुवाहाटी येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या 223 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिला विजय साजरा केला. ऑस्ट्रेलियन संघासाठी ग्लेन मॅक्सवेल याने नाबाद शतक ठोकत या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेड याने एक महत्वाची प्रतिक्रिया दिली.
मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ या सामन्यातील विजयाचा दावेदार होता. मात्र ग्लेन मॅक्सवेल याचे नाबाद शतक व मॅथ्यू वेड याने मोक्याच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 223 धावांची आव्हान पार केले. या विजयानंतर बोलताना वेड याने मॅक्सवेल याचे विशेष कौतुक केले. तो म्हणाला,
“मॅक्सवेल जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मात्र, मला वाटते त्याची शतक बनवण्याची प्रेरणा भारतीय डावाच्या अखेरच्या षटकात आली. त्या षटकात 30 धावा गेल्या नसत्या तर त्याने कदाचित शतक झळकावले नसते.”
भारतीय डावाच्या अखेरच्या षटकात मॅक्सवेल गोलंदाजी करत असताना ऋतुराज गायकवाड यांनी त्याच्या गोलंदाजीवर तब्बल 30 धावा कुटल्या होत्या. त्यानंतर मॅक्सवेलने आपल्या फलंदाजी वेळी केवळ 48 चेंडूंमध्ये 104 धावांची वादळी खेळी केली.
या सामन्याचा विचार केल्यास भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 222 धावा केल्या होत्या. भारतासाठी उपकर्णधार ऋतुराज गायकवाड याने 57 चेंडूंमध्ये नाबाद 123 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त कर्णधार सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा यांनी देखील उपयुक्त योगदान दिले. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला हेडने वादळी सुरुवात दिली. त्यानंतर मॅक्सवेलने अखेरपर्यंत नाबाद राहतात 48 चेंडूंमध्ये 104 धावांची खेळी केली. त्यामुळे आता मालिकेतील उर्वरित दोन सामने आणखी महत्त्वाचे ठरणार आहेत.
(Matthew Wade Statement After Glenn Maxwell Century In Guwahati T20I)
महत्वाच्या बातम्या
आमिरच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाबाबत मोहम्मद हाफीजचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘मी स्वत: त्याला…
‘माझं नाव व्हीव्हीएस लक्ष्मण आहे’, पहा असं का म्हणाला इशान किशन