क्रिकेटच्या मैदानावर बऱ्याचदा क्रिकेटपटूंच्या भावनांवरील नियंत्रण सुटते. रागाच्या भरात क्रिकेटपटू कधी पंचांशी भिडतात तर कधी आपल्याच सहकारी खेळाडूच्या अंगावर धावून जातात. मॅक्स 60 कॅरिबियनच्या 22 व्या सामन्यात शनिवारी (24 ऑगस्ट) न्यूयॉर्क स्ट्रायकर्सचा सामना ग्रँड केमन जॅग्वार्सशी झाला. न्यूयॉर्क स्ट्रायकर्सने हा सामना 8 धावांनी जिंकला. सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये पंचांच्या निर्णयावर नाराज फलंदाजाला राग अनावर झाला आणि रागाच्या भरात फलंदाजाने असे काही केले, ज्यामुळे सीमारेषेपलीकडे उभा असलेला खेळाडू जखमी होण्यापासून बचावला.
त्याचे झाले असे की, न्यूयॉर्क स्ट्रायकर्सचा अष्टपैलू खेळाडू कार्लोस ब्रॅथवेटला जोश लिटलने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बेन डंकने कार्लोस ब्रॅथवेटला यष्टीच्या मागे झेलबाद केले. चेंडू कार्लोस ब्रॅथवेटच्या बॅटवर नव्हे तर खांद्यावर लागला असे रिप्लेमध्ये दिसले. पण पंचांचे म्हणणे होते की, चेंडू ग्लोव्हजला लागला. पंचांच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पॅव्हेलियनमध्ये परतताना कार्लोस ब्रॅथवेट चांगलाच चिडलेला दिसला.
पव्हेलियनमध्ये परतताना कार्लोस ब्रॅथवेट त्याचा हेल्मेट चेंडूप्रमाणे हवेत फेकतो आणि बॅटने जोरदार फटका मारतो. यावेळी, सीमेपलीकडे उभा असलेला दुसरा खेळाडू दूर जातो आणि हेल्मेट सीमारेषेच्या बाहेर पडतो. जर सीमारेषेबाहेरील खेळाडू वेळेत तिथून सरकला नसता तर त्याला दुखापत झाली असती. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
— Cric guy (@Cricguy88) August 25, 2024
दरम्यान सामन्यांवर नजर टाकली तर, न्यूयॉर्क स्ट्रायकर्सने ग्रँड केमन जॅग्वार्सचा 8 धावांनी पराभव केला. ग्रँड केमन जॅग्वार्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूयॉर्क स्ट्रायकर्सने 10 षटकांत 8 विकेट्स गमावून 104 धावा केल्या. प्रत्युत्तरात ग्रँड केमन जॅग्वार्स संघाला निर्धारित षटकांत 5 विकेट्स गमावून केवळ 96 धावा करता आल्या.
हेही वाचा –
“माझ्या मुलाला निवृत्तीबद्दल समजले असेल”, निवृत्तीनंतर मुलगा जोरावरबद्दल शिखर धवन भावूक
बाबर आझमचा फ्लॉप शो! बांगलादेशच्या पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयामागची 3 कारणं जाणून घ्या
बांगलादेशनं इतिहास रचला! पाकिस्तानची घरच्या मैदानावर नाचक्की