भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा आणि अखेरचा वनडे सामना बुधवारी (2 डिसेंबर 2020) कॅनबेरा येथे खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने 302 धावा केल्या. प्रतिउत्तरादाखल ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजीला आलेल्या मॅक्सवेलने एक शानदार षटकार ठोकला. त्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
303 धावांच्या आव्हानाला पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली आणि अवघ्या 25 धावांवर या संघाला पहिला झटका बसला. सलामीवीर मार्नस लंबूशेन अवघ्या 7 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला टिकून खेळता आले नाही. ठराविक अंतराने गडी बाद होण्याची मालिका सुरूच राहिली. 210 धावांवर ऑस्ट्रेलियाला 6 वा धक्का बसला. यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स कॅरी 38 धावा करून तंबूत परतला.
त्यावेळी अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल खेळपट्टीवर खेळत होता. त्याने आक्रमक शैलीत फटके खेळायला सुरुवात केली. मात्र डावाच्या 36 व्या षटकांत लांबलचक षटकार खेचत त्याने सर्वांचे लक्ष वेधले.
फिरकीपटू रवींद्र जडेजा 36 वे षटक फेकायला आला. तिसऱ्या चेंडूवर मॅक्सवेलने षटकार मारला. त्यानंतर जडेजाने चौथा चेंडू गुड लेन्थवर फेकला. मात्र या चेंडूवरही मॅक्सवेलने लॉन्ग ऑनवरून षटकार मारला. तो षटकाराचा चेंडू डीप मिड-विकेटवरुन थेट स्टॅन्डच्या छतावर गेला.
???? Tonked it ????
Glenn Maxwell has deposited one on the roof ???? #AUSvINDpic.twitter.com/amSE4HGXF6
— ICC (@ICC) December 2, 2020
Back-to-back fifties for Glenn Maxwell ????
Can he guide Australia to a win? They need 51 more.#AUSvINDpic.twitter.com/zFsPUKdZUx
— ICC (@ICC) December 2, 2020
या सामन्यात मॅक्सवेल 38 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 59 धावा करून बाद झाला. त्याला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्रिफळाचित केले. तो बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव 49.2 षटकात 289 धावांवर संपला. त्यामुळे भारताने हा सामना 13 धावांनी जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘रनमशीन’ विराट कोहलीसाठी २०२० वर्ष ठरले वाईट; १२ वर्षांनंतर आली ‘अशी’ नकोशी वेळ
व्वा…भारीच ! सर जडेजाने डाइव्ह मारत घेतला ग्रीनचा अवघड झेल, पाहा व्हिडीओ
अरर! तुफान फॉर्ममध्ये असलेला इंग्लंडचा फलंदाज शतक पूर्ण करायलाच विसरला; ९९ धावांवर राहिला नाबाद






