---Advertisement---

‘द्विशतकवीर’ मयंक अगरवालने हे ५ पराक्रम करत मिळवले दिग्गजांच्या यादीत स्थान

On: शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2019 6:35 PM
---Advertisement---

इंदोर। भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात होळकर क्रिकेट स्टेडियमवर पहिला कसोटी सामना(1st Test) सुरु आहे. या सामन्यात आज दुसऱ्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात 114 षटकात 6 बाद 493 धावा केल्या आहेत.

आजचा दिवस भारताचा सलमीवीर फलंदाज मयंक अगरवालने(Mayank Agarwal)द्विशतकी खेळी करत गाजवला आहे. त्याने 303 चेंडूत षटकार खेचत त्याचे कारकिर्दीतील दुसरे द्विशतक पूर्ण केले.

त्याने भारताच्या पहिल्या डावात 330 चेंडूत 243 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 28 चौकार आणि 8 षटकार मारले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील दुसरे  द्विशतक होते. विशेष म्हणजे त्याने कसोटी कारकिर्दीतील केवळ 12 व्या डावात खेळताना दुसरे द्विशतक केले आहे.

मयंकने हे द्विशतक करण्याबरोबरच अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

मयंकने केले हे खास विक्रम –

#एका कसोटी डावात सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय क्रिकेटपटू –

8 षटकार – मयंक अगरवाल (विरुद्ध बांगलादेश, 2019)

8 षटकार – नवज्योत सिंग सिद्धू (विरुद्ध श्रीलंका, 1994)

#कसोटीत सर्वात जलद पहिली दोन द्विशतके करणारे फलंदाज-

5 डाव – विनोद कांबळी

12 डाव – मयंक अगरवाल

13 डाव – डॉन ब्रॅडमन

14 डाव – लॉरेन्स रोव

15 डाव – ग्रॅमी स्मिथ

#एकाच वर्षात दोन कसोटी द्विशतके करणारे भारतीय सलामीवीर

2008 – विरेंद्र सेहवाग

2019 – मयंक अगरवाल

#बांगलादेश विरुद्ध कसोटीमध्ये द्विशतके करणारे भारतीय फलंदाज –

1 – सचिन तेंडूलकर (2004)

1 – विराट कोहली (2017)

1 – मयंर अगरवाल (2019)

#कसोटीत षटकार मारत द्विशतक पूर्ण करणारे फलंदाज – 

रोहित शर्मा – विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रांची, 2019

मयंक अगरवाल – विरुद्ध बांगलादेश, इंदोर, 2019

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---