विशाखापट्टण। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात बुधवारपासून(2 ऑक्टोबर) पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात पहिल्या डावात भारताकडून रोहित शर्मा आणि मयंक अगरवाल या दोघांनीही शतके केली आहेत.
या सामन्यात रोहित 244 चेंडूत 176 धावांची खेळी करुन बाद झाला. तर मयंक अजूनही नाबाद असून त्यानेही 150 धावांचा टप्पा पार केला आहे. मयंकचे हे कसोटी कारकिर्दीतील पहिलेच शतक ठरले आहे.
याबरोबरच तो कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून शतक करणारा 86 वा खेळडू ठरला आहे. त्याच्याआधी भारताकडून कसोटीत 85 खेळाडूंनी किमान एकतरी शतक केले होते.
सध्या कसोटीमध्ये इंग्लंडच्या सर्वाधिक खेळाडूंनी शतके केली आहेत. इंग्लंडच्या 168 खेळाडूंनी कसोटीमध्ये किमान एक तरी शतक केले आहे. त्यांच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाच्या 137 खेळाडूंनी कसोटीमध्ये किमान एक शतक केले आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकवीर खेळाडू असणाऱ्या देशांच्या यादीत भारत 86 शतकवीर खेळाडूंसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकवीर खेळाडू असणारे देश –
168 – इंग्लंड
137 – ऑस्ट्रेलिया
86 – भारत
84 – वेस्ट इंडीज
76 – न्यूझीलंड
70 – दक्षिण आफ्रिका
68 – पाकिस्तान
38 – श्रीलंका
23 – झिम्बाब्वे
21 – बांगलादेश
1 – अफगाणिस्तान, आयर्लंड
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारताकडून कसोटीत ८९ सलामीवीर खेळले, पण असा पराक्रम करणारा रोहित ठरला दुसराच
–द्विशतक हुकले पण तरीही रोहितचा झाला या दिग्गजांमध्ये समावेश
–अखेर ८२ षटकानंतर दक्षिण आफ्रिकेला मिळाली टीम इंडियाची पहिली विकेट…