भारतीय संघाचा महत्वाचा फलंदाज मयंक अगरवाल कसोटी क्रिकेट सोडले, तर इतर दोन्ही पॉरमॅटमध्ये अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये. याच कारणास्तव नोव्हेंबर २०२० नंतर त्याला भारतासाठी मर्यादित षटकांचा एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाहीये. आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना देखील त्याला समाधानकारक कामगिरी करता आली नाहीये. असे असले तरी, त्याने अद्याप भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात पुनरागमन करण्याच्या अपेक्षा सोडल्या नाहीत.
मयंक अगरवाल (Mayank Agarwal) सध्या कर्नाटक राज्यातील टी-२० क्रिकेट स्पर्धा महाराजा ट्रॉफी खेळत आहे. त्याचे या स्पर्धेतील प्रदर्शन पाहले तर, ते जबरदस्त आहे. चालू हंगामात त्याने आतापर्यंत खेळलेल्या ११ डावांमध्ये ५३.३३ च्या सरासरीने ४८० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १६० पेक्षा जास्त होता. महाराजा ट्रॉफीमध्ये आतापर्यंत २ शतक आणि ठोकणाऱ्या मयंकने अजूनही भारतासाठी मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळण्याच्या अपेक्षा सोडल्या नाहीत. त्याला अशा आहे की, तो लवकरच संघात पुनरागमन करेल.
मयंक अगरवाल म्हणाला की, “मागच्या चार महिन्यांमध्ये मी माझ्या फलंदाजीवर खूप मेहनत घेतली आहे. तुम्ही पाहू शकता मी आता वेगवान गोलंदाजांना स्वीप आणि रिवर्स स्वीपही खेळू शकतो. मी माझ्या खेळातील चार पाच गोष्टी बदलल्या, ज्याचा मला फायदा मिळत आहे. मी पराभव स्वीकारणाऱ्यांमधील नाहीये. मी सतत याचा (संघात पुनरागमन) पाठलाग करत राहील. मी फक्त माझ्या खेळात सुधारणा करत राहील.”
दरम्यान, मयंकच्या कारकिर्दीचा एकंदरीत विचार केला, तर त्याने २१ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४१.३३ च्या सरासरीने १४८८ धावा केल्या आहेत. यामध्ये चार शतक आणि दोन दुहेरी शतकांचाही समावेश आहे. भारतासाठी पाच एकदिवसीय सामने खेळल्यानंतर त्याने फक्त ८६ धावांचे योगदान दिले. आयपीएलमध्ये त्याने ११३ सामन्यात २३३१ धावा केल्या असल्या तरी, भारतासाठी एकही टी-२० सामना खेळू शकला नाहीये.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आता चीनलाही खेळायचय ‘जबरा’ क्रिकेट! भारताकडेच मागितली ‘या’ गोष्टीची मदत
रोज मारतोयं १५० षटकार! भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानच्या फलंदाजाचा भयानक प्लान
बांगलादेशच घोडं आशिया कप आधीच अडल! एका पाठोपाठ तीन मॅचविनर स्पर्धेतून बाहेर