---Advertisement---

‘तो’ मैदानावर येताच सिराजला मिळाली विकेट, बघा कोण आहे ‘मिया भाई’चा लकीचार्म

On: गुरूवार, मार्च 4, 2021 7:07 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघावर २-१ ने विजय मिळवला होता. या मालिकेत कर्णधार विराट कोहली पितृत्व रजा घेत माघारी परतला होता; तर इतर मुख्य खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर झाले होते. अशातच मोहम्मद सिराजला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या मालिकेत त्याने सर्वाधिक १३ गडी बाद केले होता. भारतीय संघात एक असा खेळाडू आहे जो मोहम्मद सिराजसाठी लकी आहे. तो लकी खेळाडू ज्या सामन्यांमध्ये सिराजसोबत खेळला आहे. त्या सामन्यात सिराजने संघासाठी चांगली कामगिरी केली आहे.

२६ वर्षीय सिराजने ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेल्या कामगिरीनंतर सर्वत्रच त्याचे कौतुक केले गेले होते. परंतु इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत त्याला जास्त संधी मिळाली नाही. चौथ्या कसोटी सामन्यातून बुमराहने माघार घेतल्याने सिराजला संधी देण्यात आली आहे. या सामन्यात त्याने सुरुवातीलाच २ गडी बाद केले आहेत. अशातच भारतीय संघाचा फलंदाज मयंक अगरवाल हा सिराजसाठी लकी असल्याचे दिसून आले आहे.

मयंक आहे सिराजसाठी ‘लकी’

इंग्लंडविरुद्ध होत असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात मयंकला स्थान मिळाले नाही. परंतु तो पर्याय क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात आला होता. मयंक मैदानात आल्यानंतर पुढील काही षटकातच सिराजने इंग्लिश कर्णधार जो रूटला बाद केले. याआधी देखील मयंक मैदानात असताना सिराजला, फलंदाजाना बाद करण्यात यश आले आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिराज सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज होता. त्यावेळी देखील मयंक मैदानात उपस्थित होता आणि सतत सिराजसोबत संवाद साधत होता.

चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे वर्चस्व

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांवर संपुष्टात आला आहे. यात बेन स्टोक्सने सर्वाधिक ५५ धावा केल्या आहेत. तर डॅनियल लॉरेन्सनेही ४९ धावांचे योगदान दिले आहे. भारतीय संघाकडून गोलंदाजी करतांना मोहम्मद सिराजने २ गडी, अक्षर पटेलने ४ गडी, आर अश्विन ३ आणि वॉशिंग्टन सुंदरला १ गडी बाद करण्यात यश आले.

महत्त्वाच्या बातम्या-

पोलार्डने सहा षटकरांच्या विक्रमाची बरोबरी केल्यावर युवराजने दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाला…

जसप्रीत बुमराहच्या लग्नाचे ठिकाण ठरले? ‘या’ स्थळी होणार शुभमंगल

इम्रान ताहिरची संवेदनशीलता, विकेट घेताच ‘ही’ कृती करत वाहिली मित्राला श्रध्दांजली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---