किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा फलंदाज मयंक अगरवालला इंडियन प्रीमियर लीग २०२० (आयपीएल)च्या तयारीसाठी नेट्समध्ये पुनरागमन करण्याची कसलीही भीती नाही. सोबतच आयपीएलमध्ये न खेळण्यापेक्षा, जैव सुरक्षित वातावरणाच्या कठोर नियमांचे पालन करण्यात त्याला कसल्याही प्रकारची समस्या नसल्याचे त्यांने सांगितले आहे. Mayank Agarwal Talks About Nets Practice And Bio-Bubble Rules
अगरवालपुर्वी किंग्स इलेव्हन संघाचा कर्णधार केएल राहुल आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीने त्यांनी नेट्समध्ये सराव करताना विषयीची चर्चा केली होती. ५ महिन्यांनंतर क्रिकेटचा सराव करणे हे त्यांना मोठ्या सुट्टीनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्योजोगे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले होते. पण, अगरवालची अशी स्थिती नाही.
अगरवालने पीटीआयशी बोलताना म्हटले की, “मला अशाप्रकारची कोणतीही भिती नाही. जेव्हा मी सराव करायला गेलो तेव्हा मी माझ्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. मी त्यावेळी जिथून मी क्रिकेटला सोडले होते तिथूनच क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा जास्त विचार करत होतो. मी पहिल्या ३-४ सराव सत्रांमध्ये स्वत:चे मूल्यांकन करण्याचा प्रयत्न केला नाही.”
अगरवाल म्हणाला की, “आमचे प्रशिक्षक अनिल कुंबळे सत्राची तिव्रता हळूहळू वाढवत आहेत. ते मला म्हणाले की, मी शारिरिकरित्या पुनरागमन केले आहे. पण माझ्यातील कौशल्यांना वाढवण्यासाठी मला अजून थोडा वेळ लागेल. हे सर्व केवळ तुमची फलंदाजी लय परत आणण्यासाठी आहे. इथे खूप गरमी आहे. त्यामुळे मी येथील वातावरणाची माझ्या शरीराला सवय होण्यासाठी जेव्हा जास्त ऊन असेल तेव्हा सराव करत आहे.”
युएईत आल्यानंतर सर्व खेळाडू ६ दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये होते. दरम्यान खेळाडूंचे कोरोना अहवाल ३ वेळा निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना जैव सुरक्षित वातावरणात जाण्याची परवानगी मिळाली. आयपीएलच्या पूर्ण हंगामात कोणत्याही खेळाडू किंवा अधिकाऱ्याला जैव सुरक्षित वातावरणाच्या बाहेर जाऊन कुणालाही भेटण्याची परवानगी नाही. असे केल्यास त्या व्यक्तिवर कारवाई करण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे.
अगरवाल गेल्या २ हंगामांपासून किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा भाग आहे. दरम्यान त्याने २४ सामन्यात फलंदाजी करत ४५२ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
किंग्स इलेव्हन पंजाबच्या खेळाडूंनी असा घालवला समुद्र किनाऱ्यावर वेळ, पहा व्हिडिओ
सर्फराज क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात जांभई देणारा जगातील पहिला क्रिकेटपटू, पहा कुणी केली टीका
बापरे! आयपीएल खेळाडूंच्या कोरोना टेस्टसाठी बीसीसीआय करणार एवढे करोड खर्च
ट्रेंडिंग लेख –
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: शंभर कसोटी सामन्यांच्या उंबरठ्यावर असणारा इशांत शर्मा
असे ५ परदेशी क्रिकेटर, जे आयपीएलमधून कमवतात सर्वाधिक पैसे
आयपीएलमध्ये ‘या’ ५ खेळाडूंना मिळाले क्षमतेपेक्षाही अधिक पैसे, पण कामगिरीच्या बाबतीत मात्र…