---Advertisement---

व्वा काय डोकं चालवलंय! चेंडू चमकवण्यासाठी मयंकने शार्दुलच्या हातावर घासला चेंडू, पाहा व्हिडिओ

On: सोमवार, जानेवारी 18, 2021 5:46 PM
---Advertisement---

ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना सुरु आहे. या सामन्यादरम्यान चौथ्या दिवशी (१८ जानेवारी) भारताचा क्रिकेटपटू मयंक अगरवाल चेंडू चमकवण्यासाठी शार्दुल ठाकूरच्या हातावर चेंडू चोळताना दिसला. अनेकांना हे दृष्य पाहून असे मयंकने का केले हे समजले नाही. या घटनेचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

खरंतर मयंक शार्दुलच्या हाताला आलेल्या घाम चेंडूवर लावून तो चमकवण्याचा प्रयत्न करत होता, ज्यामुळे गोलंदाजांना मदत मिळेल. कारण आयसीसीने गोलंदाजांना चेंडूला थूंकी लावण्यास निर्बंध घातले आहे.

कारण गेल्या १ वर्षापासून जग कोरोना व्हायरच्या संकटाचा सामना करत आहे. या संकटांचा जगातील जवळपास सर्व क्षेत्रांवर परिणाम झाला, ज्यामुळे अनेक गोष्टींमध्ये बदल करावा लागला. यात क्रिकेट खेळाचाही समावेश आहे. काही महिने पूर्णपणे ठप्प पडलेले क्रिकेट जगत मागीलवर्षी जूलैमध्ये पुन्हा सुरु झाले. यादरम्यान कोरोनाचा धोका लक्षात घेऊन काही नियम बदलण्यात आले होते. त्यात चेंडूला थूंकी न लावण्याचाही नवीन नियम करण्यात आला होता. याचवेळी खेळाडूंना घामाचा वापर चेंडू चमकवताना करता येईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते.  त्याचमुळे मयंक चेंडू शार्दुलच्या हाताला आलेल्या घामावर घासत होता.

https://twitter.com/cricketcomau/status/1351001723255607302

सामन्यात दोन्ही संघांचे पारडे समान – 

ब्रिस्बेन येथे सुरु असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे त्यांनी पहिल्या डावातील ३३ धावांच्या आघाडीसह भारताला ३२८ धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामीला फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरले. मात्र त्यांनी ११ चेंडू खेळल्यानंतर लगेचच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. खेळ थांबला तेव्हा भारताने १.५ षटकात बिनबान ४ धावा केल्या होत्या. आता भारताला शेवटच्या दिवशी ३२४ धावांची गरज आहे, तर ऑस्ट्रेलियाला भारताच्या सर्व १० विकेट्स घेण्याचे आव्हान आहे.

हा सामना ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील निर्णायक सामना आहे. कारण पहिल्या तीन सामन्यांनंतर दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीच्या स्थितीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

शब्बास रे पठ्ठ्या! सिराजने पदार्पणाची मालिका खेळतानाच मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान

ब्रिस्बेन कसोटीतील दमदार कामगिरीनंतर सिराजची प्रतिक्रिया, ‘या’ कारणासाठी मानेल रहाणेचे आभार

ऑस्ट्रेलियाच्या या गोलंदाजाने शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरवर उधळली स्तुतीसुमने; म्हणाला….

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---