भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला रविवारी (6 ऑक्टोबर) पासून सुरूवात झाली. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात युवा वेगवान गोलंदाज मयंक यादवने (Mayank Yadav) पदार्पण केले आहे. मयंकने पदार्पणातच आश्चर्यकारक कामगिरी करून अजित आगरकरच्या (Ajit Agarkar) खास यादीत स्थान मिळवले आहे.
वास्तविक, मयंक यादवने (Mayank Yadav) पदार्पणाच्या पहिल्याच षटकात एकही धाव दिली नाही आणि त्याने हे षटक मेडन टाकले. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. पॉवरप्लेचे शेवटचे षटक टाकण्यासाठी मयंकला पाचारण करण्यात आले होते. यादवने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्याच षटकात आपल्या वेगवान गोलंदाजीचा कहर केला आणि इतिहास रचला.
पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्याच षटकात मेडन षटक टाकणारे भारतीय गोलंदाज
अजित आगरकर विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2006)
अर्शदीप सिंग विरुद्ध इंग्लंड (2022)
मयंक यादव विरुद्ध बांगलादेश (2024)
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs PAK; भारताचा पाकिस्तानवर 6 गडी राखून शानदार विजय
धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार का? या दिवशी जाहीर होईल निर्णय
रिचा घोषचा अद्भूत झेल, चाहत्यांना आली धोनीची आठवण; VIDEO पाहून विश्वासच बसणार नाही!