---Advertisement---

मुंबई क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी एमसीएने मागवले अर्ज, पाहा काय आहे प्रशिक्षक होण्यासाठीची अट

---Advertisement---

मुंबई क्रिकेट असोशिएशन ही देशातील एक श्रीमंत क्रिकेट संघटना समजली जाते. मुंबईच्या क्रिकेट संघातील क्रिकेटपटूंबरोबरच येथील कोच व अन्य स्टाफचीही नावे व ओळख अनेकांना असते. आता याच मुंबई क्रिकेट असोशिएशनने मुख्य प्रशिक्षकासह अन्य पदांसाठी अर्ज मागितले आहेत. यासाठी मुंबई क्रिकेट असोशिएशन अर्थात एमसीएने काही अटीही ठेवल्या आहेत.

आपल्या वेबसाईटवर त्यांनी या पदासंबंधी माहिती दिली आहे. यात ते म्हणतात, ‘क्रिकेट सुधारणा समितीच्या शिफारशीनुसार मुंबई वरिष्ठ पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवत आहोत. यासाठी अर्जदाराने कमीत कमी ५० प्रथम श्रेणी सामने खेळलेले असणे गरजेचे आहे. तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमी अर्थात एनसीएमने त्याला प्रशिक्षण देण्याचे प्रमाणपत्र दिलेले असणे गरजेचे आहे. तसेच त्याला कोणत्याही राज्य क्रिकेट संघाला किंवा आयपीएलमधील संघांना प्रशिक्षण देण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे व तो मुंबईत स्थायिक असायला हवा.’

गेल्या हंगामात मुंबईने अमित पागनिस यांना सईद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी प्रशिक्षक म्हणून निवडले होते. परंतू राष्ट्रीय टी२० स्पर्धेतील खराब प्रदर्शनानंतर त्यांनी प्रशिक्षक पद सोडले होते. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीसाठी एमसीएने माजी भारतीय फिरकीपटू रमेश पोवार यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली होती परंतू पोवार आता पुन्हा एकदा राष्ट्रीय वरिष्ठ महिला संघाचे प्रशिक्षक बनले आहेत. त्यामुळे एमसीए आता नविन प्रशिक्षकांच्या शोधात आहे.

हेही वाचा-

गोलंदाजांच्या मेहनतीला क्षेत्ररक्षकांची साथ! कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक झेल घेणारे ३ भारतीय खेळाडू

पहिल्याच चेंडूवर षटकार अन् तिसऱ्याच सामन्यात शतक, इंग्लंडच्या भूमीत पंतचा दबदबा; गाजवणार आगामी दौरा

INDvNZ: विराटचा भिडू भारतीय फलंदाजांसाठी ठरणार कर्दनकाळ, अवघ्या ६ कसोटीत घेतल्यात ३६ विकेट्स

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---