भारतीय संघाने गेल्या काही महिन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. या मोठ्या सामन्यानंतर भारतीय संघासमोर इंग्लंड संघाचे आव्हान असणार आहे. भारतीय संघाला या दौऱ्यावर ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेत भारतीय संघाला युवा रिषभ पंतकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
काही दिवसांपूर्वी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वीच भारतीय संघाने पाहुण्या इंग्लंड संघाला कसोटी मालिकेत ३-१ ने धूळ चारली होती. त्यामुळे या मालिकेत इंग्लंड संघ भारतीय संघाचा पाहुणचार करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. परंतु भारतीय संघाकडे प्रतिभाशाली यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आहे, जो तुफान फॉर्ममध्ये आहे. रिषभ पंत या मालिकेत देखील चांगली कामगिरी करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
इंग्लंडमध्ये खेळलेल्या कसोटी सामन्यात रिषभ पंतची कामगिरी
रिषभ पंतने आतापर्यंत इंग्लंडमध्ये एकूण ३ कसोटी सामने खेळले आहेत. हे तिनही सामने २०१८ मध्ये खेळले होते. हा दौरा रिषभ पंतसाठी खूप खास होता. कारण याच दौऱ्यावर त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. या मालिकेत त्याने २७ च्या सरासरीने १६२ धावा केल्या होत्या. यात ११४ धावा ही त्याची सर्वाधिक खेळी होती.
त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात षटकार मारून केली होती. त्याला साउथॅम्प्टनच्या मैदानावर ० आणि १८ धावा करण्यात यश आले होते. तर मालिकेतील पाचव्या आणि कारकिर्दीतील तिसऱ्याच सामन्यात त्याने ११४ धावांची खेळी केली होती.
रिषभ पंत सध्या ज्या प्रकारच्या फॉर्ममध्ये आहे, ते पाहता तो या दौऱ्यावरदेखील भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावू शकतो. रिषभने आतापर्यंत एकूण २० कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला ४५.३ च्या सरसरीने १३५८ धावा करण्यात यश आले आहे. यात त्याला ६ अर्धशतक आणि ३ शतक झळकावण्यात यश आले आहे. तसेच नाबाद १५९ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvNZ: विराटचा भिडू भारतीय फलंदाजांसाठी ठरणार कर्दनकाळ, अवघ्या ६ कसोटीत घेतल्यात ३६ विकेट्स
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा वार्षिक करार जाहीर, नव्या गुणांकन पद्धतीसह तब्बल ८ खेळाडूंना डच्चू
दिग्गजाने कमिन्ससह ४ ऑसी गोलंदाजांना ओढले बॉल टेम्परिंग प्रकरणात; म्हणाला, “त्यांच्या साथीदाराने…”