इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यात काही ना काही विशेष घडत असतेच. कधी एखादा फलंदाज आश्चर्यचकित करणारी खेळी करतो, कधी एखादा गोलंदाज विशेष कामगिरी करतो, तर कधी एखादा खेळाडू अनपेक्षित झेल घेतो. मात्र, राजस्थान रॉयल्सविरुद्ध गुजरात टायटन्समध्ये झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात देखील असेच एक अनपेक्षित दृष्य पाहायला मिळाले.
राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज ओबेद मॅकॉय १०व्या षटकात गोलंदाजी करत असताना गुजरात टायटन्सचा फलंदाज मॅथ्यू वेडने त्याच्या एका चेंडूवर जोरदार फटका लगावला. चेंडू आता थेट सीमारेषेबाहेर जाईल, असे मॅकॉयला वाटत होते. अशा स्थितीत त्याने बॉलवरून डोळे काढून डोक्याला हात मारायला सुरुवात केली. यादरम्यान अचानक आवाज आला आणि जेव्हा मॅकॉयने मागे वळून पाहिले, तेव्हा त्याला विकेट मिळाल्याचे समजले. त्यानंतर मॅकॉय काही काळ संभ्रमित अवस्थेत असल्याचे पाहायला मिलाले.
Obed McCoy was thinking it was a six and kicking himself then knew Buttler caught it. pic.twitter.com/SJBEyL2LNc
— Pakistan Troll Army (@Deepans20127002) May 24, 2022
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आयपीएल २०२२च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरातला जिंकण्यासाठी १८९ धावांचे लक्ष्य होते. लक्ष्याचा पाठलाग करत असताना मॅथ्यू वेडने जोरदार ३५ धावांची खेली केली. राजस्थानकडून मॅकॉय १०वे षटक टाकण्यासाठी आला, तेव्हा वेडने त्याच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जोरदार पूल शॉट खेळला. मॅकॉयला वाटलं की, षटकार जाईल, म्हणून त्याने डोळे वळवले आणि डोकं आपटायला सुरुवात केली. मात्र, यादरम्यान सीमारेषेवर उभ्या असलेल्या बटलरने षटकारांचे रूपांतर झेलबादमध्ये केले होते. राजस्थानचे खेळाडू जेव्हा मॅकॉयच्या दिशेने धावू लागले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, हा षटकार नसून झेल आहे.
दरम्यान, हा बळी मिळाल्यानंतर मॅकॉयच्या प्रतिक्रिया खूप मजेदार होत्या. त्याला आश्चर्य वाटले. याचा उल्लेख तो राजस्थानच्या सहकारी खेळाडूंपुढेही करताना दिसला. सहकारी खेळाडूंनीही त्याचा खूप आनंद लुटला. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
महा स्पोर्टसच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल फायनलला अजून चार दिवस बाकी, मग काय करणार? पाहा गुजरातच्या ट्वीटवर काय म्हणाला राशिद खान
बटलरच्या वादळी खेळीने रचला जबरदस्त विक्रम; ठरला आयपीएलच्या इतिहासातील सातवाच फलंदाज
‘माझ्या खेळीवर टीका केली जायची, त्यामुळे मी…’, गुजरातच्या मॅचविनर पठ्ठ्याची मोठी प्रतिक्रिया