---Advertisement---

वडील सेक्युरिटी गार्ड, तर आई अंगनवाडी सेविका; आता लेक ब्लू जर्सीत गाजवणार ऑस्ट्रेलिया दौरा

On: शुक्रवार, ऑगस्ट 27, 2021 12:56 AM
---Advertisement---

खेळ ही अशी गोष्ट आहे जेथे गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव केला जात नाही. क्रिकेटमध्येही असे अनेक खेळाडू आहेत, जे अत्यंत गरीब कुटुंबातून आले आणि या खेळाने त्यांना एक ओळख मिळवून दिली. एखादा क्रिकेटपटू एकदा देशासाठी खेळला की आयुष्यभर त्याला आर्थिक अडचणी भासत नाहीत. दरम्यान महिला क्रिकेटमध्ये देखील अशाच एका क्रिकेटपटूने प्रवेश केलाय, जी अत्यंत गरीब कुटुंबातून पुढे आली आहे. या महिला क्रिकेटपटूचे नाव आहे मेघना सिंग.

बिजनौर ते टीम इंडिया पर्यंतचा प्रवास
बिजनौरच्या एका छोट्या गावातून येणाऱ्या मेघनाने आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप नाव कमावले असून, आता ती भारतीय महिला क्रिकेट संघात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. मेघनाचे हे घवघवीत यश पाहून गावकरी तिचे तोंडभरून कौतुक करत आहेत. मेघना ही एक मध्यमगती गोलंदाज असून, ती लवकरच भारतीय संघाच्या निळ्या जर्सीमध्ये दिसू शकते. मेघना सिंगची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यासाठी निवड झाली असून, या दौऱ्याची सुरुवात १९ सप्टेंबर पासून होईल. या दौऱ्यावर भारतीय संघाला एक कसोटी सामना, वनडे मालिका आणि टी२० मालिका खेळायची आहे.

 वडील करतात गार्डची नोकरी
आपल्या मुलीला आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचवण्यात मेघनाच्या आई-वडिलांचा मोलाचा वाटा आहे. बिजनौरमध्ये असलेल्या कोतवाली देहात या छोट्याश्या गावात राहणारी मेघना ही मध्यमवर्गीय कुटुंबातून येते. तिचे वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी साखर कारखान्यात सिक्युरिटी गार्डची नोकरी करतात. तर तिची आईदेखील वडिलांना हातभार लावताना अंगणवाडी सेविकेचे काम करते. याच गावात तिने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली होती.

मुलांसोबत खेळायची क्रिकेट
मेघनाला लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड होती. परंतु तिच्यासोबत खेळायला कोणीच नव्हते. त्यामुळे ती मुलांसोबत क्रिकेट खेळत असे. इथूनच तिच्या खेळात सुधारणा व्हायला सुरुवात झाली होती. तिने जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. इतकेच नव्हे तर तिने या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी देखील केली होती. इथूनच तिच्या कारकिर्दीला वेगळे वळण मिळालेले. मेघनाने यापूर्वी बांगलादेश संघाविरुद्ध २ टी २० सामने खेळले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

असा सामना पुन्हा होणे नाही! ९२ धावांवर डाव घोषित करुनही एक डाव अन् २७ धावांनी जिंकली मॅच

“एकट्या कोहलीवर बोट दाखवू नका, तेंडूलकर-पाँटिंगलाही आल्या होत्या अशा अडचणी”

पंजाब किंग्जला मजबूती, १४ कोटींच्या खेळाडूच्या जागी इंग्लंडच्या ‘या’ श्रेयस्कर गोलंदाजांची निवड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---