मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात असलेला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना प्रेक्षकांचा अनोखा उत्साह आणि ऐतिहासिक उपस्थितीमुळे संस्मरणीय ठरला. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. दोन्ही संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी आपलं सर्वस्व देत आहेत, परंतु चर्चेचा विषय प्रेक्षकांची ऐतिहासिक गर्दी आहे.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडनं यावेळी प्रेक्षकांच्या संख्येचा नवा विक्रम नोंदवला. हा सामना पाहण्याची प्रेक्षकांनी अशी क्रेझ दाखवली, ज्यामुळे या मैदानावरील 88 वर्षा जुना रेकॉर्ड मोडल्या गेला. हा कसोटी सामना पाहण्यासाठी पाच दिवसांमध्ये तब्बल 3,50,700 हून अधिक चाहते मैदानावर पोहोचले. यासह 1936 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड कसोटीत बनलेला विक्रम मोडल्या गेला आहे.
या बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी (26 डिसेंबर) 87,242 चाहते मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आले होते. दुसर्या दिवशी 85,147 प्रेक्षक मैदानावर उपस्थित होते. तिसर्या दिवशी 83,073, चौथ्या दिवशी 43,867 आणि आज पाचव्या दिवशी 51,371 चाहते मैदानावर आले. अशाप्रकारे पाच दिवसांत एकूण 3,50,700 पेक्षा जास्त चाहत्यांनी मेलबर्न कसोटीचा आनंद घेतला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या कसोटीनं 1936 मधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड कसोटीतील प्रेक्षक संख्येचा 88 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला आहे. त्यावेळी मेलबर्नच्या एमसीजी येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात 3,50,584 दर्शकांची नोंद झाली होती. आता 2024 मध्ये हा रेकॉर्ड मोडल्या गेला आहे.
येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, भारताच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा 25 वर्षांपूर्वीचा विक्रम अजूनही कायम आहे. 1999 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान कोलकाता कसोटीत सुमारे 4,64,000 प्रेक्षक आले होते.
हेही वाचा –
मिचेल स्टार्कनं यशस्वी जयस्वालला पुन्हा छेडलं, युवा फलंदाजाचं सडेतोड उत्तर; पाहा व्हायरल VIDEO
विराट कोहलीच्या निवृत्तीची वेळ जवळ आलीय? पाहा आकडेवारी काय सांगते
मेलबर्न कसोटीत फक्त बुमराहचीच हवा! या कामगिरीसह दिग्गजांच्या लिस्टमध्ये एंट्री