भारतीय संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. यादरम्यानच चाहत्यांसाठीही एक आनंदाची बातमी आहे. 26 ते 30 डिसेंबर दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता दाट आहे.
हा सामना परंपरेनुसार मेलबर्न येथे होणार आहे आणि सोमवारी(26 ऑक्टोबर) मेलबर्न येथील लॉकडाऊन उठले आहे. त्यामुळे विक्टोरियन राज्याचे प्रमुख डॅनिएल अँड्र्यूस यांनी सांगितले आहे की मेलबर्नच्या ऐतिहासिक स्टेडियमवर चाहत्यांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाईल.
याबरोबरच त्यांनी असेही सांगितले की कोविड-19 च्या संकटामुळे या सामन्यासाठी किती प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाईल, याबाबत अजून काही सांगता येत नाही.
ते म्हणाले, ‘माला खात्री आहे की बॉक्सिंग डे कसोटीसाठी मेलबर्नवर प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाईल. मला माहित नाही की किती प्रेक्षकांना परवानगी दिसी जाईल, पण तिथे प्रेक्षक असतील. आम्ही यावर काम करत आहोत.’
जर खरंच या सामन्यासाठी प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली तर हा कोविड-19 च्या काळात प्रेक्षकांच्या उपस्थित होणारा पहिला क्रिकेट सामना ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधीच टीम इंडियाच टेन्शन वाढल ; ‘या’ व्यक्तीला झाली कोरोनाची लागण
ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी सुरु; प्रशिक्षक रवि शास्त्रींसमवेत दोन दिग्गज खेळाडू यूएईला रवाना
ब्रेकिंग.! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; पाहा टी-२०, वनडे आणि कसोटी संघाची संपुर्ण यादी
ट्रेंडिंग लेख –
कुमार संगकारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बावनकशी सोनं
गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण
आयपीएलमध्ये डंका वाजलाच, आता ‘मिशन ऑस्ट्रेलिया’; ‘हा’ आर्किटेक्ट बांधणार संघाच्या विजयाचा पूल