भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा येत्या शुक्रवारपासून (२७ नोव्हेंबर) वनडे सामन्याने सुरु होत आहे. त्याआधी भारतीय संघ सिडनीमध्ये कसून मेहनत घेत आहे. या दरम्यान भारतीय खेळाडूंमध्ये रविवारी (२२ नोव्हेंबर) एक क्रिकेट सामना खेळला गेला. यासाठी भारतीय खेळाडूंचेच २ संघ तयार करण्यात आले होते. या सामन्याबद्दल बीसीसीआयने इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत माहिती दिली.
हा सामना ४०-४० षटकांचा झाला होता. तसेच सीके नायडू इलेव्हन आणि रणजीत सिंगजी इलेव्हन असे दोन संघ करण्यात आले होते. सीके नायडू संघाचा कर्णधार विराट कोहली होता. तर रणजीत सिंगजी संघाचा कर्णधार केएल राहुल होता. हा सामना सुरु होण्याआधी सिडनी येथे थोडा पाऊस झाल्याने सामन्याला उशीर झाला.
केएल राहुलची कर्णधारपदाला साजेशी खेळी –
या सामन्यात रणजीत सिंगजी संघाने प्रथम फलंदाजी केली. त्यांच्याकडून शिखर धवन आणि मयंक अगरवाल यांनी सलामीला फलंदाजी केली. तर त्यांच्याकडून कर्णधार केएल राहुलने ६६ चेंडूत ८३ धावांची खेळी केली. रणजीत सिंगजी संघाने ४० षटकात २३५ धावा केल्या आणि सीके नायडू संघाला २३६ धावांचे आव्हान दिले.
विराटच्या संघाने केला यशस्वी पाठलाग –
या आव्हानाचा पाठलाग सीके नायडू संघाकडून पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते. तसेच या संघाकडून कर्णधार विराटने शानदार खेळी करताना ५८ चेंडूत ९१ धावा केल्या. त्यामुळे या संघाने ५ विकेट्स गमावत ३५.४ षटकातच धावांचे आव्हान पूर्ण केले.
तसेच बीसीसआयने शेअर केलेल्या फोटोवरुन असे दिसते की केएल राहुलने यष्टीरक्षण केले होते. तसेच आर अश्विन नाबाद राहिला असावा.
भारतीय संघाच्या जवळपास अडीच महिन्याच्या असलेल्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. २७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान वनडे मालिका होईल. त्यानंतर ४ ते ८ डिसेंबरदरम्यान टी२० मालिका होणार आहे. ही मालिका संपल्यानंतर १७ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल. १९ जानेवारीला कसोटी मालिकेचा शेवट होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये झिरो ठरलेला ‘तो’ भारताविरुद्ध ‘हिरो’ ठरण्यासाठी घेतोय कसून मेहनत
‘रोहित आणि इशांतला कसोटी मालिका खेळायची असेल तर ३-४ दिवसात विमानात बसावे लागेल, अन्यथा..’
‘दंगल गर्ल’ बबीता फोगट होणार आई, फोटो शेअर करत दिली ‘गुड न्यूज’