---Advertisement---

‘एकदम से वक्त बदल दिया’, राजस्थानने पंजाबच्या तोंडून विजयाचा घास हिरावल्याने मीम्सचा पडतोय पाऊस

On: बुधवार, सप्टेंबर 22, 2021 7:00 AM
---Advertisement---

दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील दुसऱ्या टप्प्याला युएई येथे सुरुवात झाली. या टप्प्यातील तिसरा सामना मंगळवारी (२१ सप्टेंबर) पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अखेरच्या चेंडूपर्यंत थरार रंगला. या सामन्यात अखेरच्या क्षणी राजस्थानने २ धावांनी विजय मिळवत गुणतालिकेत पाचवा क्रमांक मिळवला आहे.

राजस्थानने पंजाबसमोर विजयासाठी १८६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने चांगली सुरुवात केली होती. अखेरच्या षटकात त्यांना केवळ ४ धावांची गरज होती आणि ८ विकेट्स शिल्लक होत्या. पण शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या कार्तिक त्यागीने केवळ १ धाव दिली आणि २ विकेट्सही घेतल्या. त्यामुळे नाट्यपूर्ण ठरलेल्या अखेरच्या षटकात पंजाब ४ धावाही करु न शकल्याने राजस्थानने हा सामना २ धावांनी जिंकला.

त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या सामन्याबद्दल विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी कार्तिक त्यागीचे कौतुक केले आहे, तर अनेकांनी पंजाब संघाला ट्रोल केले आहे. अनेक मीम्सही सध्या व्हायरल होत आहेत. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने क्रिकेट चाहत्याचे प्रसिद्ध मीम शेअर केले आहे. ज्यावर लिहिले आहे की ‘एकदम से वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी.’ तसेच दुसऱ्या एका वापरकर्त्याने सामन्याबद्दल म्हटले ‘वाह, काय क्लायमॅक्स होता.’

https://twitter.com/AbhinandDS1/status/1440388182814519305

https://twitter.com/Mujahid_Vk18/status/1440384766985920513

https://twitter.com/Yash_ch108/status/1440368687052034058

या सामन्यात १८६ धावांचा पाठलाग करताना पंजाबकडून कर्णधार केएल राहुल आणि मयंक अगरवालने १२० धावांची सलामी दिली होती. राहुलने ४९ धावा, तर मयंकने ६७ धावांची खेळी केली होती. तसेच नंतर एडेन मार्करम (२६*) आणि निकोलस पूरन (३२) यांनी ५७ धावांची भागीदारी केली होती. पण अखेरच्या क्षणी कार्तिक त्यागीने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे पंजाबला विजय मिळवता आला नाही. पंजाबला २० षटकांत ४ बाद १८३ धावाच करता आल्या.

तत्पूर्वी राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सर्वबाद १८५ धावा केल्या होत्या. राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ४९ धावा केल्या. तसेच महिपाल लोमरोरने ४३ आणि एविन लुईने ३६ धावांची आक्रमक खेळी केली. तर, पंजाबकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

अर्शदीप सिंगने ५ विकेट्स तर घेतल्या, पण ‘हा’ नकोसो विक्रमही झाला नावावर

कार्तिक त्यागीने जिंकली क्रिकेटविश्वातील मान्यवरांची मनं; बुमराहपासून स्टेनपर्यंत, दिग्गजांनी गायले गोडवे

Video: पंजाबला ४ धावांची गरज, पण कार्तिकच्या १ धावांत २ विकेट्स अन् राजस्थानचा विजय, पाहा अखेरच्या षटकाचा थरार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---