---Advertisement---

आयपीएल २०२१ स्थगित होताच सोशल मीडियावर मीम्सचा सुळसुळाट; आरसीबी झाली सर्वाधिक ट्रोल

On: बुधवार, मे 5, 2021 1:06 AM
---Advertisement---

भारतात गेल्या एक वर्षापासून कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. त्याच गेल्या महिन्याभरात कोरोना व्हायरसच्या धोक्याची परिसीमा गाठली आहे. या कोरोनाच्या विळख्यात अनेक क्षेत्र अडकली आहेत. यात क्रीडा क्षेत्राचाही समावेश आहे. नुकताच इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा १४ वा हंगाम अर्ध्यातून अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसने आयपीएल २०२१ चा हंगाम सुरु असताना संघांच्या बायोबबलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे गेल्या २ दिवसात काही संघांचे काही खेळाडू आणि सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे अखेर मंगळवारी बीसीसीआयने हा हंगाम २९ सामने पूर्ण झाल्यानंतर स्थगित केला.

हा निर्णय जाहीर करताना आयपीएलच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की ‘बीसीसीआय खेळाडूंच्या, सपोर्ट स्टाफच्या आणि आयपीएल आयोजनात सहभागी असलेल्या कोणाच्याही सुरक्षेबाबत तडजोड करणार नाही.’

चाहत्यांकडून मीम्स व्हायरल 
बीसीसीआयच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स चाहत्यांकडून व्हायरल करण्यात आले. यामध्ये अधिक करुन रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ट्रोल करण्यात आले.

कारण गेल्या १४ हंगामात खेळत असलेल्या बेंगलोरने एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही; तसेच यंदाच्या त्यांनी हंगामात चांगली कामगिरी केली असल्याने ते यंदाच्या हंगामाच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यामुळे त्यांना ट्रोल करणारे अनेक मीम्स आयपीएल २०२१ चा हंगाम स्थगित झाल्यानंतर व्हायरल झाले. असे असले तरी केवळ बेंगलोरलाच नाही तर अन्य संघांनाही काही चाहत्यांनी ट्रोल केले आहे.

https://twitter.com/__Muskurahat__/status/1389498195722399746

https://twitter.com/DareToSarcasm/status/1389489618488217601

https://twitter.com/viratian18184/status/1389489805801627649

https://twitter.com/SakshiNegi_7/status/1389489441786404867

https://twitter.com/shribirajdar/status/1389488003739906049

https://twitter.com/SRK_Soldier/status/1389496209878966274

दिल्ली गुणतालिकेत अव्वल
आयपीएल २०२१ हंगाम स्थगित होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स या दोन संघांचे ८ सामने खेळून झाले होते. तर अन्य ६ संघांचे ७ सामने पूर्ण झाले होते. या सामन्यांनंतर दिल्ली १२ गुणांसह अव्वल क्रमांकावर होते. तर चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर प्रत्येकी १० गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते. तर मुंबई इंडियन्स चौथ्या, राजस्थान रॉयल्स पाचव्या, पंजाब किंग्स सहाव्या, कोलकाता नाईट रायडर्स सातव्या आणि सनरायझर्स हैदराबाद आठव्या क्रमांकावर होते.

महत्त्वाच्या बातम्या –

घरी परत जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचक ‘या’ देशात होणार रवाना?

चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूची संवेदनशीलता, भारताला केली कोरोनाविरोधी लढ्यासाठी ‘ही’ मदत

आयपीएल २०२१: चेन्नईला पुन्हा मोठा धक्का; गोलंदाजी प्रशिक्षकानंतर आता ‘हा’ प्रमुख सदस्य कोरोना पॉझिटिव्ह

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---