---Advertisement---

टी२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याची तारिख समजल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा सुळसुळाट

Rohit Sharma Shikhar Dhawan and Amir
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तानचे संबंध किती कडू आहेत, हे आपल्या सर्वांना माहित आहे. अशा परिस्थितीत जेव्हा दोन्ही देशांचे क्रिकेट संघ मैदानावर येतात, तेव्हा वातावरण तणावाचे असते. या दोन संघांच्या सामन्यावेळी चाहत्यांमध्येही वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. तरी मागील काही वर्षात हे दोन संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्येच आमने-सामने येतात.

त्यानुसार नुकतेच असे वृत्त समोर आले आहे की आगामी टी२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनेक चाहत्यांनी मीम्सही शेअर केल्या आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियावर #INDvsPAK ट्रेंड करत आहे.

https://twitter.com/cricmeet/status/1422842485462626311

https://twitter.com/kadak_chai_/status/1422840824698589188

https://twitter.com/noonecreate/status/1422843662602407937

https://twitter.com/SunnySi23874153/status/1422869682294464514

जरी भारत-पाकिस्तान सामन्याची तारिख समोर आली असली तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अजून ही या टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलेले नाही. यावेळी युएई आणि ओमान येथे हा टी२० विश्वचषक ऑक्टोबर – नोव्हेंबरदरम्यान खेळला जाणार आहे. यापूर्वी हा विश्वचषक भारतात खेळला जाणार होता, परंतु कोरोनामुळे आयसीसीने स्पर्धेचे स्थळ बदलले आहे.

हे संघ होणार सहभागी
मुख्य टी२० विश्वचषक स्पर्धेआधी आठ संघांत पात्रता फेरी खेळवली जाईल. त्यामध्ये दोन्ही गटातून अव्वल राहिलेले प्रत्येकी दोन संघ मुख्य फेरीसाठी पात्र ठरतील. पात्रता फेरीच्या अ गटात श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड व नामिबिया तर, ब गटात बांगलादेश, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, ओमान यांचा समावेश आहे. यामधून अव्वल चार संघ मुख्य स्पर्धेत खेळतील.

मुख्य स्पर्धेतील गटवारी (सुपर १२):
अ गट- ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, अ १, ब २.
ब गट- भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, ब १, ए २.

महत्त्वाच्या बातम्या – 

“तर आर अश्विन त्याचा फॉर्म गमावून बसेल”, मुथय्या मुरलीधरनने व्यक्त केली भीती

“पहिल्या कसोटीत भारताला त्या खेळाडूची भासेल कमतरता”, दिग्गज भारतीय क्रिकेटरची प्रतिक्रिया

अभिनंदन! इंग्लंडचा सर्वात यशस्वी फलंदाज बनला रूट, केली ‘ही’ अद्वितीय कामगिरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---