---Advertisement---

जेव्हा एखादी नविन मुलगी वर्गात एन्ट्री मारते, तेव्हा..! विराट-रोहितच्या ‘त्या’ फोटोवर भन्नाट मीम्स व्हायरल 

On: शनिवार, फेब्रुवारी 6, 2021 5:55 PM
---Advertisement---

क्रिकेट रसिक कधी काय करतील याचा अंदाज लावणे अतिशय कठीण असते. बऱ्याचदा एखाद्या खेळाडूच्या खराब कामगिरीवरुन रसिक त्याला सोशल मीडियावर ट्रोल करतात. तर क्रिकेटपटूंच्या एखाद्या फोटोला एडिट करतात त्याचे मजेशीर मीम्स तयार करतात. असेच काहीसे भारतीय कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांच्या एका फोटोबाबत झाले आहे.

झाले असे की, चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड संघात पहिला कसोटी सामना चालू आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसापासूनच पाहुण्यांनी दमदार कामगिरी करत यजमानांची पुरती दैना करून सोडली. अशा स्थितीत डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीमच्या एका चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने खणखणीत चौकार मारला.

यावेळी विराट आणि रोहित असहाय्य हावभावाने रूटने मारलेला चेंडू सीमारेषेच्या पार जाताना पाहत होते. त्यांचा यावेळचा तो क्षण कॅमेरात कैद झाला आणि काही तासातच तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर नेटकऱ्यांनी ट्विटरवर त्या फोटोचे जबरदस्त मीम्सचा बनवून शेअर केले आहेत. तसेच वेगवेगळ्या क्षणांशी त्या फोटोंचा संबंध जोडत विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

https://twitter.com/RohitianShubham/status/1357639662316126209?s=20

https://twitter.com/manoj__45_/status/1357659156258254850?s=20

https://twitter.com/Madan_Chikna/status/1357659909752557569?s=20

https://twitter.com/SankalpT27/status/1357637031598321667?s=20

https://twitter.com/memegineers_/status/1357642812158746627?s=20

https://twitter.com/ritik_mishra_/status/1357657697265405953?s=20

इंग्लंडच्या पहिल्या डावात ५५५ धावा 

सामन्याविषयी बोलायचे झाले तर, इंग्लंडने दुसऱ्या दिवसाखेर ५५५ धावा केल्या आहेत. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याच्या द्विशतकी खेळीचा या मोलाचा वाटा राहिला. ३७७ चेंडूत २ षटकार आणि १९ चौकारांच्या मदतीने त्याने २१८ धावा केल्या आहेत. तसेच डोम सिब्ले (८७ धावा) आणि बेन स्टोक्स (८२ धावा) यांनीही योगदान दिले आहे.

भारताकडून इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, शाहबाज नदीम, आर अश्विन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

INDvsENG 1st Test: जो रुटच्या विक्रमी द्विशतकानंतर इंग्लंडचं शेपूटही वळवळलंच; दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडच्या ८ बाद ५५५ धावा

मला अवॉर्ड मिळणार नाही का? विराटच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक होत असताना इंग्लिश गोलंदाजाची विनोदी प्रतिक्रिया

थँक्यू नदीम! ज्याच्या निवडीवरून केली टीका तोच ठरला टीम इंडियाचा संकटमोचक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---