पुरुष हॉकी विश्वचषक 2023 ची सुरुवात बुधवारी (11 जानेवारी) कटकमधील बाराबती स्टेडियम येथे देशभरातील आणि परदेशातील हजारो हॉकीप्रेमींच्या साक्षीने उद्घाटन सोहळ्यासह झाली. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व 16 संघांच्या सदस्यांचे स्वागत करण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचे अध्यक्ष तयब इकराम आणि हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी केले. या उद्घाटन सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग, अभिनेत्री दिशा पटानी व गायक के-पोप यांनी चार चांद लावले.
𝗔𝗡 𝗘𝗟𝗘𝗖𝗧𝗥𝗜𝗙𝗬𝗜𝗡𝗚 𝗣𝗘𝗥𝗙𝗢𝗥𝗠𝗔𝗡𝗖𝗘 ⚡@RanveerOfficial made a grand entrance at the #BarabatiStadium and swayed the audience with his charismatic performance.#HockeyComesHome #HockeyHaiDilMera #OdishaForHockey #HWC2023 #HockeyWorldCup pic.twitter.com/IwQS739Oe7
— Odisha Sports (@sports_odisha) January 11, 2023
जवळपास तासभर चाललेल्या या उद्घाटन सोहळ्यात ओडिशाच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले. यामध्ये पारंपरिक नृत्याचा समावेश होता. प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग, अभिनेत्री दिशा पटानी, गायक के-पॉप, ओडिया गायक स्निती मिश्रा, ऋतुराज मोहंती, लिसा मिश्रा आणि अभिनेता पती-पत्नी सब्यसाची मिश्रा आणि अर्चिता साहू यांच्यासह अनेकांनी प्रेक्षकांना आपल्या कलेने मंत्रमुग्ध केले.
आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचे अध्यक्ष इकराम यांनी आपल्या भाषणात ओडिशाचे सलग दोनदा विश्वचषकाचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले आणि राज्याला ‘हॉकीची भूमी’ म्हटले. 2018 हॉकी विश्वचषकाचे यजमानपदही ओडिशाने भूषवले होते. विश्वचषकाचे पुन्हा एकदा यशस्वी आयोजन केल्याबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ओडिशा सरकारचे आभार मानले.
ओडिशातील राऊरकेला येथील बिरसा मुंडा स्टेडियम व भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियम येथे हा विश्वचषक खेळला जाईल. 13 जानेवारी स्पर्धेचे सामने सुरू होऊन 29 जानेवारी रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. 1975 नंतर प्रथमच भारतीय संघ विश्वचषक उंचावण्याचा प्रयत्न करेल.
(Mens Hockey World Cup 2023 Starts With Electrifying Opening Ceremony In Cuttuck)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अनसोल्ड राहिलेला शनाका खेळणार आयपीएल 2023? श्रीलंकेचे प्रशिक्षक म्हणतायेत…
जवळपास अशक्यच! सचिनचा ‘हा’ विक्रम मोडणे विराटच्या आवाक्याबाहेर, करावी लागेल अविश्वसनीय कामगिरी