---Advertisement---

“मार्गदर्शक रणनीती तयार करण्यास मदत करू शकेल, पण मैदानात प्रत्यक्ष खेळाडूंनाच खेळावे लागेल”

On: शनिवार, ऑक्टोबर 23, 2021 12:45 AM
MS Dhoni, Rohit Sharma, Virat Kohli and Ravi Shastri
---Advertisement---

टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू झाली आहे. २३ ऑक्टोबरपासून सुपर १२ चे सामने खेळवले जाणार आहेत. भारताचा सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ तयार आहे. त्याची प्रचिती सराव सामन्यात सर्वांनाच आली आहे. यातच महान कसोटी फलंदाज सुनील गावसकर यांनी टी २० विश्वचषक २०२१ साठी मार्गदर्शक म्हणून भारतीय संघात एमएस धोनीच्या समावेशाचे स्वागत केले आहे.

पण, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जेव्हा सामने खेळले जातील तेव्हा मार्गदर्शक मैदानावर उपलब्ध नसतील, तेव्हा खेळाडूंना त्यांची बुद्धिमत्ता दाखवावी लागेल. अशा परिस्थितीत मार्गदर्शक खेळाडूंना जास्त मदत करू शकणार नाही.

गावसकर म्हणाले, ‘मार्गदर्शक जास्त काही करू शकत नाही. टी२० प्रकारात झपाट्याने बदल होत असतात. मार्गदर्शक तुम्हाला ड्रेसिंग रूममध्ये रणनिती तयार करण्यात मदत करू शकतो. गरज पडल्यास तो तुम्हाला रणनीती बदलण्यातही मदत करू शकतो.’

गावसकर पुढे म्हणाले, ‘मार्गदर्शक फलंदाज आणि गोलंदाजांशी टाइम-आऊट दरम्यान बोलू शकतो, त्यामुळे धोनीची नियुक्ती करणे एक चांगली बाब आहे, पण धोनी ड्रेसिंग रूममध्ये असेल आणि खेळाडूंना मैदानावर प्रत्यक्ष काम करावे लागेल. खेळाडू सामन्याचे दडपण कसे हाताळतात यावर सामन्याचा निकाल निश्चित राहील.’

भारत रविवारी (२४ ऑक्टोबर) सुपर १२ च्या टप्प्यात पाकिस्तानशी खेळणार आहे आणि गावसकर यांच्या मते, विराट कोहलीचा संघ विजयाचा प्रबळ दावेदार आहे. या दरम्यान, सुनील गावसकर यांनी जागतिक स्पर्धेत बाद फेरीत भारताच्या अपयशाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

ते म्हणाले की मोठ्या सामन्यांमध्ये भारताकडून अनेकदा योग्य संघ निवडण्यात चूक होते आणि हेच त्यांच्या पराभवाचे मोठे कारण बनते. गावसकर म्हणाले, ‘मोठ्या सामन्यांमध्ये भारताची समस्या सांघिक संयोजनाची आहे. जर त्यांनी बाद फेरीच्या सामन्यांमध्ये योग्य प्लेइंग इलेव्हनची निवड केली असती, तर भारतीय संघाला कमी अडचणी आल्या असत्या.’

महत्त्वाच्या बातम्या – 

श्रीलंकेने नेदरलँड्सचा ४४ धावांत धूव्वा उडवत मिळवला दणदणीत विजय, ‘हा’ विक्रमही केला नावावर

आता रंगणार सुपर १२ फेरीचा थरार! कधी, कुठे होणार सर्व सामने, जाणून घ्या एका क्लिकवर

‘हे’ दोन संघ टी२० विश्वविजेता बनण्याचे सर्वात मोठे दावेदार, शेन वॉर्नने वर्तवले भाकीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---