---Advertisement---

म्हणून स्टार फुटबॉलपटू मेस्सी होतोय ट्रोल…

---Advertisement---

रशियात सुरू असलेली 2018 फिफा विश्वचषक स्पर्धा जशी जशी पुढे सरकत आहे तसे तसे स्पर्धा रंगतदार होत चालली आहे.

2014 फिफा विश्वचषकाचे उपविजेते अर्जेंटीनाला गुरूवार दि. 21 जूनला झालेेल्या सामन्यात क्रोएशियाकडून 3-0 असा पराभव स्विकारावा लागला.

फिफा विश्वचषकाला सुरूवात होण्यापूर्वी स्पर्धेच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या अर्जेंटीनाला ड गटात झालेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवता आला नाही.

आइसलँड विरुद्धचा पहिला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला तर क्रोएशिया विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात अर्जेंटीनाला 3-0 अशा फरकाने पराभूत व्हावे लागले आहे.

या कामगिरीमुळे अर्जेंटीनाने जर पुढच्या सामन्यात नायजेरीया विरोधात मोठ्या फरकाने विजय मिळवला नाही तर स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की अर्जेंटीनावर ओढावू शकते.

तसेच अर्जेंटीनाच्या खराब कामगिरीचे खापर अपेक्षितपणे कर्णधार लिओनेल मेस्सीवर फोडण्यात येत आहे.

अर्जेंटीनाच्या या पराभवानंतर जगभरातील अनेक फुटबॉल चाहत्यांनी मेस्सी आणि अर्जेंटीनाला सोशल मेडीया वरून ट्रोल केले.

https://twitter.com/isa_okiror/status/1009899494241112064?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=https%3A%2F%2Fwww.rt.com%2Fsport%2F430491-messi-argentina-croatia-world-cup%2F

https://twitter.com/TopperLDN/status/1009900691287142400?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=https%3A%2F%2Fwww.rt.com%2Fsport%2F430491-messi-argentina-croatia-world-cup%2F

काही चाहत्यांना मेस्सी आणि रोनाल्डो वादाचा आधार घेत मेस्सीला ट्रोल केले.

https://twitter.com/Lee_Daggett/status/1009883891153494016?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=https%3A%2F%2Fwww.rt.com%2Fsport%2F430491-messi-argentina-croatia-world-cup%2F

https://twitter.com/360Sources/status/1009887940082913280?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=https%3A%2F%2Fwww.rt.com%2Fsport%2F430491-messi-argentina-croatia-world-cup%2F

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment