---Advertisement---

बिडीच्या पॅकेटवर झळकला मेस्सी, तर नेटकऱ्यांकडून आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

---Advertisement---

रविवारी (11 जुलै) अर्जेंटिनाने कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. या विजयानंतर संपूर्ण जगात अर्जेंटिना संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचे कौतुक होत आहे. दरम्यान, मेस्सीची चर्चा भारतात मात्र त्याच्या यशाबरोबरच एका वेगळ्या कारणासाठीही होत आहे.

सध्या सोशल मीडियावर बिडीच्या पॅकेटवर छापलेला मेस्सीचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. या पॅकेटवरुन दिसत आहे की मेस्सीच्या फोटोबरोबरच नावासह बिडी विकल्या जात आहेत. या बिडीच्या पॅकेटचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हा फोटो शेअर करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी मजेने म्हटले आहे की मेस्सीची भारतातील पहिली जाहिरात आहे. तर काहींनी म्हटले आहे की कोपा अमेरिकेचे विजेतेपद मिळताच मेस्सीला जाहीरात मिळाली.

रविवारी कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने ब्राझीलचा 1-0 असा पराभव केला. साल 1993 नंतर प्रथमच कोपा अमेरिकाचे विजेतेपद जिंकण्यात अर्जेंटिनाला यश आले. तसेच मेस्सीच्या नेतृत्वात अर्जेंटिनाचे हे पहिलेच मोठे विजेतेपद आहे.

मेस्सीने यापूर्वी अर्जेंटिनाकडून 2014 फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना, तसेच 2015 आणि 2016 सालामध्ये कोपा अमेरिका स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. मात्र, या तिन्ही अंतिम सामन्यात अर्जेंटिनाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. साल 2016 मध्ये तर कोपा अमेरिकाच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर मेस्सीने निराश होऊन आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली होती. पण, नंतर त्याने निवृत्ती मागे घेतली. अखेर यंदा अर्जेंटिनाने कोपा अमेरिकेचे विजेतेपद मिळवले. त्यामुळे अर्जेंटिनाकडून विजेतेपद जिंकण्याचे मेस्सीचे स्वप्न पूर्ण झाले.

या ऐतिहासिक विजयानंतर मेस्सीला त्याच्या संघातील साथीदारांनी खांद्यावर उचलले होते. संपूर्ण स्पर्धेत चार गोल नोंदवून संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यात मेस्सीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

मोठी बातमी! रिषभ पंत पाठोपाठ भारतीय संघातील ‘हा’ सदस्य देखील कोरोना पॉझिटिव्ह

गर्विष्ठ असल्याची सातत्याने टीका होणाऱ्या विराटनेच मैदानात घुसलेल्या चाहत्यासाठी दाखवली माणुसकी, व्हिडिओ व्हायरल

यांचं वेगळंच! सहकाऱ्याने झेल पकडूनही पाकिस्तानी यष्टीरक्षक नाखूश, भर मैदानात घातला वाद

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---