इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ६९व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ आमने- सामने होते. या सामन्यात मुंबईने ५ विकेट्सने विजय मिळवला. या विजयात टिम डेविड याने मोलाचे योगदान दिले. त्याच्या योगदानामुळे दिल्लीने हातातला सामना गमावला. डेविडने या सामन्यात ३४ धावा चोपल्या. डेविडच्या या विस्फोटक खेळीमुळे दिल्लीला प्लेऑफचे तिकीट मिळता-मिळता राहिले. आपल्या वादळी खेळीमुळे डेविडने एक खास कारनामा केला आहे. त्याने थेट अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिकचा विक्रम मोडला आहे.
तिलक वर्मासोबत केली २० चेंडूत अर्धशतकी भागीदारी
टिम डेविड (Tim David) याने यादरम्यान चौथ्या विकेटसाठी तिलक वर्मा (Tilak Varma) याच्यासोबत २० चेंडूत अर्धशतकी भागीदारी केली. यामध्ये डेविडने ११ चेंडूंचा सामना करताना ३४ धावांची विस्फोटक खेळी केली. या धावा त्याने ३०९.०९च्या स्ट्राईक रेटने चोपल्या. आणि संघाला विजयाच्या दिशेने पुढे नेले. डेविड १८व्या षटकात ५व्या चेंडूवर शार्दुल ठाकूर याच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉच्या हातून झेलबाद होऊन तंबूत परतला होता. जेव्हा तो बाद झाला, तेव्हा मुंबईला १३ चेंडूत १५ धावांची आवश्यकता होती.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
२००हून अधिकच्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा
आपल्या डावात डेविड आयपीएल २०२२मध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेटने (१५०हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये) धावा करणारा खेळाडू बनला. त्याने याबाबतीत दिनेश कार्तिकलाही मागे टाकले. चालू हंगामात डेविडला ८ सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याने यादरम्यान ३ वेळा नाबाद राहत ३७.२०च्या सरासरीने आणि २१६.२७च्या स्ट्राईक रेटने १८६ धावा चोपल्या. यादरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही ४६ होती. दुसरीकडे, दिनेश कार्तिकने आतापर्यंत खेळलेल्या १४ सामन्यात १९१.३३च्या स्ट्राईक रेटने २८७ धावा चोपल्या आहेत.
या यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या लियाम लिविंगस्टोनने १७७.९८च्या स्ट्राईक रेटने आणि चौथ्या स्थानी असलेल्या आंद्रे रसेलने १७४.४८च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्लेऑफमध्ये का पोहोचू शकली नाही दिल्ली? पाहा कर्णधार पंतने काय सांगितलंय कारण
‘आम्ही लयीत यायला उशीर केला, पण…’, रोहितची मुंबईच्या कामगिरीबद्दल मोठी प्रतिक्रिया