आयपीएल 2025 स्पर्धेच्या आधी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघाला झटका बसला आहे. संघातील स्क्वाड मध्ये सामील असलेला लिजाद विलियम्स दुखापतीच्या कारणाने स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मुंबई इंडियन्सने लिजादला मेगा लिलावात 75 लाख रुपयांना खरेदी केले होते. आता त्याच्या बाहेर पडल्यानंतर संघाने त्याच्या जागी एका खेळाडूचे नाव अधिकृतरित्या घोषित केले आहे. संघाने साऊथ आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू कार्बिन बॉशला संघात स्थान दिले आहे.
कार्बिन बॉश 2014 मध्ये आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप जिंकलेली साउथ आफ्रिकेच्या अंडर 19 संघाचा भाग होता. त्याने अंतिम सामन्यात शानदार फलंदाजी केली होती. त्यादरम्यान त्याने 15 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या होत्या. यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याने 2024 मध्ये साऊथ आफ्रिका संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
लिजाद विलियम्सच्या जागी मुंबई इंडियन्स शने आयपीएल 2025 साठी सातवा अष्टपैलू खेळाडू संघात ठेवला आहे. कार्बिन बॉशच्या आधी हार्दिक हार्दिक पांड्या सहित सहा अष्टपैलू खेळाडू संघात सामील होते. उजव्या हाताचा फलंदाज कार्बिन मिडल ऑर्डर मध्ये चांगली फलंदाजी करू शकतो. त्याने 86 टी20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 663 धावा केल्या आहेत आणि 59 विकेट्स घेतल्या आहेत.
आगामी आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या संघात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रॉबिन मिंज, रयान रिकेलटन, श्रितीज कृष्णन , बेवोन जैकब्स, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, विल जैक्स, मिचेल सेंटनर, राज अंगद बावा, विघ्नेश पुथुर, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मा, दीपक चाहर, अश्विन कुमार, रीस टोप्ले, वेंकटा सत्यनारायण, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, जसप्रीत बुमराह, कार्बिन बॉश इत्यादी खेळाडू समाविष्ट आहेत.
हेही वाचा
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पावसाचा धोका? क्रिकेटप्रेमी जाणून घ्या हवामानाचा अंदाज
रवींद्र जडेजा समोर विराट-रोहितही फेल, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय





