---Advertisement---

ये भी देखो जरा! स्टॉयनिसने भिरकावला तब्बल १०४ मीटरचा खणखणीत षटकार; नंतर दिली ‘अशी’ रिऍक्शन

On: शनिवार, एप्रिल 16, 2022 10:46 PM
Marcus-Stoinis
---Advertisement---

मुंबई इंडियन्स संघाला शनिवारी (दि. १६ एप्रिल) आयपीएल २०२२मधील २६व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सकडून १८ धावांनी पराभवाचा धक्का बसला. हा मुंबईचा हंगामातील सलग सहावा पराभव होता. यापूर्वी कोणत्याही हंगामात मुंबईने पहिले ६ सामने गमावले नव्हते. मात्र, यंदाच्या हंगामात मुंबई संघ खराब कामगिरी करताना दिसत आहे. दुसरीकडे, लखनऊ संघाने हा सामना जिंकत हंगामातील चौथा विजय मिळवलाय. विशेष म्हणजे, यादरम्यान लखनऊच्या खेळाडूने एक गगनचुंबी षटकार खेचला. त्याने मारलेल्या षटकाराचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

झाले असे की, या सामन्यात मुंबईने (Mumbai Indians) नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि लखनऊला (Lucknow Super Giants) फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी फलंदाजी करताना लखनऊ संघाने शानदार सुरुवात केली. विशेष म्हणजे, सलामीला फलंदाजीला आलेला कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) वादळी शतक झळकावले. यासोबतच तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. यावेळी त्याने अवघ्या ६० चेंडूत १०३ धावा कुटल्या. यामध्ये ५ षटकार आणि ९ चौकारांचा समावेश होता. राहुलने यावेळी क्विंटन डी कॉकसोबत ५२ धावांची भागीदारी केली. डी कॉक बाद झाल्यानंतर त्याने मनीष पांडेसोबत ७० धावांची भागीदारी रचली. यानंतर फलंदाजीला मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) आला. स्टॉयनिसने खेळपट्टीवर उतरताच पहिल्याच चेंडूवर गगनचुंबी षटकार खेचला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

स्टॉयनिसचा षटकार पाहून असेच वाटले की, तो डगआऊटमधूनच सेट होऊन आलाय. स्टॉयनिसने या वेळी १४वे षटक टाकत असलेल्या मुरुगन अश्विनच्या तिसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार मारला. त्याने मारलेला हा षटकार तब्बल १०४ मीटर लांबीचा होता. हा षटकार खेचल्यानंतर स्टॉयनिस कॅमेऱ्यासमोर हसतानाही दिसला होता.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1515287917291212806?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1515287917291212806%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-mi-vs-lsg-marcus-steinsch-hits-a-skyscraper-six-of-104-meters-on-the-very-first-ball-watch-video-6278674.html

आयपीएल २०२२मध्ये सर्वात लांब षटकार खेचणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलायचं झालं, तर यामध्ये मुंबई इंडियन्स संघाचा विस्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेविसचे (Dewald Bravis) नाव अव्वलस्थानी येते. त्याने पंजाब किंग्सविरुद्ध खेळताना तब्बल ११२ मीटर लांबीचा षटकार मारला होता.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

आनंदाची बातमी! तब्बल ४ वर्षांनंतर यंदाच्या हंगामात बीसीसीआय करणार ‘या’ गोष्टीचे आयोजन

सलग सहाव्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात? पाहा बाद फेरीसाठीचे पर्याय

रुसवा, फुगवा की संधी न मिळण्यामागची निराशा? वडील सचिनच्या शेजारी तोंड पाडून बसलेला दिसला अर्जुन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---