---Advertisement---

VIDEO : असं फक्त तोच करू शकतो!! मुंबईच्या ‘या’ स्टार खेळाडूने घेतलेल्या सुपर कॅचनंतर सचिनची कौतुकाची थाप

On: बुधवार, ऑक्टोबर 7, 2020 10:56 AM
---Advertisement---

आयपीएलमध्ये बुधवारी (7 ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईने राजस्थानला 57 धावांनी पराभूत केले. या सामन्यादरम्यान मुबंईचा अष्टपैलू कायरान पोलार्ड याने सीमारेषेजवळ एक जबरदस्त झेल घेतला. त्याने घेतलेल्या झेलचे सर्वत्र कौतुक होत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही त्याचे कौतुक केले आहे.

या सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सनने टाकलेल्या १४ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर बटलरने हवेत फटका मारला. त्यावेळी सीमारेषेजवळ उभा असलेल्या पोलार्डने हवेत उडी घेऊन एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला, पहिल्या प्रयत्नात तो झेल घेऊ शकला नाही, तरीही चेंडू हातातून खाली पडण्यापूर्वी पोलार्डने कसाबसा पकडला आणि बटलर 70 धावांवर बाद झाला.

सचिन तेंडुलकरने पोलार्डने घेतलेल्या झेलवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि ट्विट करताना लिहिले की केवळ पोलार्डच सातत्याने असा झेल घेऊ शकतो.

https://twitter.com/sachin_rt/status/1313528673123864577?s=20

https://twitter.com/Cric_life59/status/1313530589484474368?s=20

यादरम्यान बटलरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 10 वे अर्धशतक पूर्ण केले आणि 1500 धावाही पूर्ण केल्या. तो आयपीएलमध्ये 10 अर्धशतके करणारा पहिला इंग्लंडचा क्रिकेटपटू आहे.

https://twitter.com/IPL/status/1313527425758687232?s=20

 

या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 193 धावा केल्या होत्या. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने उत्कृष्ट फलंदाजी केली. तो 79 धावा करून नाबाद राहिला. राजस्थानकडून अनुभवी फलंदाज जॉस बटलरने चांगली फलंदाजी केली. बटलरने मुंबई विरुद्ध खेळलेल्या मागील 3 सामन्यात अनुक्रमे 94, 89, 70 धावा केल्या आहेत. पण यावेळी तो राजस्थानला सामना जिंकून देण्यात अपयशी ठरला. राजस्थानचा संघ 194 धावांचा पाठलाग करताना 136 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे मुंबईने राजस्थानला 57 धावांनी पराभूत केले आणि पुन्हा गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---