मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 हंगामातील आपला 9 वा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळला. हंगामातील पहिल्या आठ सामन्यांमध्ये फक्त तीन सामन्यात संघाला विजय मिळला. मात्र, अनुभवी फिरकी गोलंदाज पियुष चावला चांगल्या फॉर्ममध्ये आहे. रविवारी (30 एप्रिल) राजस्थान रॉयल्सविरुद्धही चावलाने आपला फॉर्म कायम ठेवला.
मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) पियुष चावला (Piyush Chawla) चालू आयपीएल हंगामात आतापर्यंत 8 सामने खेळला आहे. या आठ सामन्यांपैकी प्रत्येक सामन्यात त्याने किमान एक विकेट घेतली आहे. आयपीएल हंगाम अर्ध्यात असतानाच त्याच्या विकेटचा आकडा 13 पर्यंत पोहोचला आहे. रविवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याने चार षटकांच्या कोट्यात 34 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या. जोस बटलर आणि देवदत्त पडिकल यांना चावला तंबूचा रस्ता दाखवला. चालू हंगामात त्याचे संघासाठीचे प्रदर्शन उत्कृष्ट राहिले असले, तरी मुंबईने अवघ्या 50 लाख रुपयांमध्ये त्याला खरेदी केले आहे.
आयपीएल 2023 मध्ये पियुष चावलाचे प्रदर्शन
4-0-26-0
4-0-33-1
4-0-22-3
4-0-19-1
4-0-43-2
3-0-15-2
4-0-34-2
4-0-34-2
दरम्यान उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. राजस्थानसाठी सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने शतक ठोकले. अवघ्या 53 चेंडूत जयस्वालने शतक पूर्ण केले. सलामीवीर जोस बटलर 19 चेंडूत 18 धावा करून करून चावलाच्या चेंडूवर बाद झाला. कर्णधार संजू सॅमनस तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. सॅमनने या सामन्यात 10 चेंडूत 14 धावा करून विकेट गमावली. मध्यक्रमात देवदत्त पडिकल, जेसन होल्डर आणि शिमरन हेटमायर यांनी अनुक्रमे 2, 11 आणि 8 धावा केल्या.
सातव्या क्रमांकावर आलेल्या ध्रुव जरेल याने 2 धावा करून विकेट गमावली. संघातील इतर फलंदाज अपयशी ठरले असले, तरी जयस्वालच्या शतकामुळे राजस्थानला 200 धावांचा टप्पा पार करता आला. जयस्वालने एकूण 62 चेंडू खेळले आणि 124 धावांची झंजावाती खेळी केली. मुंबईसाठी 25 वर्षीय अर्शद खान याने 39 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या. (Piyush Chawla’s Stats in IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्माला आयपीएलमध्ये हवे होते ‘या’ संघाचे कर्णधारपद, जुन्या सहकारी खेळाडूचा मोठा दावा
बर्थडे दिवशी रोहित बनला मुंबई इंडियन्सचा ‘विक्रमादित्य’, 1000 व्या सामन्यात बनवले खास पराक्रम