इंग्लंड संघाचे सध्या सुरू असलेल्या ऍशेस मालिकेतील (ashes series) प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले आहे. इंग्लंडने मालिकेतील पहिले तिन्ही कसोटी सामने गमावले आहेत. ऑस्ट्रेलिया संघाने ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्या या खराब प्रदर्शनानंतर त्यांचा कर्णधार जो रूट (joe root) याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. अशात इंग्लंडचे माजी कर्णधार माईक आर्थटन (michael atherton) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच भविष्यात संघाच्या कर्णधारपदासाठी प्रमुख दावेदाराचे नाव देखील सांगितले आहे.
माईक आर्थटन यांनी लिहिले की, ‘मला कठीण वाटते की, रूट या मालिकेनंतर पुढे नेतृत्व करेल. तो ऍशेसमध्ये सलग तीन कसोटी सामने पराभूत झाला आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये आठपैकी सात कसोटी हरला आहे. इंग्लंडचा दुसरा कोणताच कर्णधार एवढ्या कसोटी हरला नाही. चार वर्षांपूर्वीच्या खराब दौऱ्यानंतर, हा एक अजून खराब दौरा आहे, जेथे संघाने खूपच खराब प्रदर्शन केले.’
त्यांनी रूटला कर्णधारपद सोडण्याचाही सल्ला दिला आहे. पुढे लिहिले की, ‘एक वेळ अशी येते की, जेथे एका कर्णधाराला वाटते की, त्याला कर्णधाराच्या रूपात चांगले प्रदर्शन करता येत नाहीय. अशात कर्णधारपद सोडणे हाच योग्य बदल ठरतो आणि शक्यतो रूट त्या टप्प्यावर पोहोचला आहे.’
तत्पूर्वी, जो रूटच्या नेतृत्वातील इंग्लंडने २०१९ मधील ऍशेस मालिकेत २-२ असे बरोबरीचे प्रदर्शन केले. तर २०१७ आणि २०१८ मध्ये रूटच्या नेतृत्वातील संघाला ४-० अशा पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याव्यतिरिक्त मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवुड यांचे प्रदर्शन देखील निराशाजनक राहिले आहेत. आर्थटन यांनी ख्रिस सिल्वरवुड यांच्यावरदेखील निशाणा साधला आहे.
त्यांच्यामते बेन स्टोक्स हा एकमात्र पर्याय आहे, जो रूटनंतर संघाचे चांगल्या प्रकारे नेतृत्व करू शकतो. त्यांनी लिहिले की, ‘इंग्लंड स्टोक्ससारख्या प्रमुख अष्टपैलूवर अतिरिक्त जबाबदारीचे ओझे टाकेल की नाही, याबाबतीत सध्या काही सांगता येत नाही. स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन देखील निवृत्ती घेण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. इतर कोणीच संघातील त्यांच्या स्थानाविषयी सुनिश्चित नाहीये.”
महत्वाच्या बातम्या –
भान हरपून नाच बसय, तर रणवीर सिंग अन् रवी शास्त्रींचा ‘हा’ व्हिडिओ पाहाच, सर्वांचेच वेधलंय लक्ष
शानदार… उत्तम… जिंदाबाद…! टीम इंडियावर आजी-माजी दिग्गज गुणोय कौतुकाचा पाऊस
व्हिडिओ पाहा –