---Advertisement---

चौथ्या क्रमांकवर भारताने या खेळाडूला खेळवावे, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज कर्णधाराचे मत

On: शुक्रवार, जुलै 5, 2019 6:58 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात भारतीय संघाने युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला चौथ्या क्रमांकावर पुढेही खेळवत राहिले पाहिजे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार मायकल क्लार्कने म्हटले आहे.

मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या भारतीय संघातील चौथ्या स्थानावर मागील दोन सामन्यात रिषभने फलंदाजी केली आहे. त्याने सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अनुक्रमे 32 आणि 48 धावा केल्या आहेत.

इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार 21 वर्षीय रिषभबद्दल क्लार्क गुरुवारी(4 जूलै) म्हणाला, ‘रिषभ पंत हा भारतासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी चांगला पर्याय आहे. जर त्याने खराब फलंदाजी केली तरी त्याचा स्ट्राईक रेट 100 चा असेल. जर त्याने चांगली फलंदाजी केली तर त्याच्या स्ट्राईक रेट 140 आणि 150 असेल. मला वाटते ही गोष्ट भारताच्या मधल्या फळीला चांगल्या खेळपट्टीवर मदत करेल.’

याबरोबरच क्लार्कने 6 व्या क्रमांकावर दिनेश कार्तिक योग्य असल्याचे देखील म्हटले आहे. क्लार्क म्हणाला, ‘मला प्रमाणिकपणे 6 व्या क्रमांकावर दिनेश कार्तिक सारखा अनुभवी खेळाडू असणे आवडेल. तो दुसरा हार्दिक पंड्या आहे. तो मैदानात आल्यानंतर पहिल्या चेंडूवरही बाउंड्री मारु शकतो. मला वाटते भारताच्या मधल्या फळीसाठी ते चांगले स्थान आहे.’

तसेच क्लार्क पुढे म्हणाला,  रोहित शर्मा आणि विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तसेच कोहली मोठ्या शतकाच्या प्रतिक्षेत आहे.

या विश्वचषकात भारतीय संघाने आधीच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पण उपांत्य सामना खेळण्याआधी भारतीय संघ शनिवारी(6 जूलै) श्रीलंकेविरुद्ध साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळेल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

–धोनीच्या टीकाकारांना दिग्गज भारतीय फुटबॉलपटू बायचूंग भुतियाने दिले सडेतोड उत्तर

–फॅबिएन ऍलेनने एक हाती जबरदस्त झेल घेत सर्वांनाच केले थक्क, पहा व्हिडिओ

–अफगाणिस्तानच्या १८ वर्षीय इक्रम अली खीलने मोडला सचिन तेंडुलकरचा २७ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment