---Advertisement---

‘भारताकडून काहीतरी शिका…’, माजी कर्णधाराच्या मते ऑस्ट्रेलियाने केल्या ‘या’ पाच चुका

On: सोमवार, फेब्रुवारी 20, 2023 3:57 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याने ऑस्ट्रेलियन संघाने केलेल्या काही चुका निदर्शनास आणल्या, ज्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ सध्या भारतात आला आहे. मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात यजमान सघाने ऑस्ट्रेलियाला मात दिली आणि मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. क्लार्कच्या संघा सराव सामना न खेळणे, ही ऑस्ट्रेलियाची पहिली चूक होती. यावेळी त्याने एखूण पाच चुका सांगितल्या, ज्या ऑस्ट्रेलियाने करायला नको होत्या.

भारतीय संघाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 (BGT2023) चा पहिला सामना एक डाव आणि 132 धावांनी जिंकला. मालिकेतील दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने गमावला. भारताने 2-0 अशी आघाडी घेतल्यानंतर मालिकेची ट्रॉफी आपल्याकडे कायम ठेवली आहे. सोमवारी (20 फेब्रुवारी) मायकल क्लार्क (Michael Clarke) माध्यमांशी बोलत होता. यावेळी तो म्हणाला, “मी जे पाहत आहे, त्यावर हैराण आहे. कारण आपण सराव सामना खेळला नाहीये. ही खूप मोठी चूक आहे. संघाने कमीत कमी एक सामना खेळला पाहिजे होता.”

ऑस्ट्रेलियन फलंदाज भारतीय फिरकीपटूंसमोर स्वीप शॉट खेळण्याच्या नादात विकेट गमावताना दिसले. तसेच क्लार्कच्या मते ट्रेविस हेड याला पहिल्याच कसोटी सामन्यासाठी निवडले पाहिजे होते. माध्यमांशी बोलातना क्लार्क पुढे म्हणाला, “पहिल्या कसोटीतील खेळाडूंची निवड चुकीची होती. तर दुसऱ्या कसोटीती खेळाडूंनी स्वीक शॉट खेळून विकेट गमावल्या. जेव्हा तुम्ही तुमचा डाव सुरू करता, तेव्हा ही वेळ स्वीप शॉट खेळण्यासाठी योग्य नसते.” क्लार्कच्या मते भारतीय खेळाडूंकडून फिरकी गोलंदाजी कशी खेळावी, याचा धडा ऑस्ट्रेलियाने घेतला पाहिजे.

क्लार्क म्हणाला, “असे वाटत आहे की, आपला संघ भारताला फलंदाजी करताना पाहत नाहीये. भारतीय खेळाडूंना येथील परिस्थितीची जाण आहे, हे मान्य आहे आणि त्याच पद्धतीने ते खेळतात. जर आपण 200 धावा करू शकलो अशतो, तर सामनाही जिंकू शकत होतो. आपली धावसंख्या एक बाद 60 होती.” क्लार्कने यावेळी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स याच्या रणनीतीवर देखील प्रश्न उपस्थित केेल. “आमची रणनीती कशी बिघडली, यावर विश्वास बसत नाही. आपल्या हातात फक्त 100 धावा होत्या. अशात कमिन्सने सीमारेषेजवळ चार खेळाडू उभा केले होते. कसोटी सामना संपायला अडीच दिवस वेळ होता. सामना जिंकण्यासाठी तुम्हाला ऑस्ट्रेलियन संघाला 100 धावांच्या आधी बाद करावे लागेल किंवा तुम्ही सामना गमावत आहात असेच समजा” (Michael Clarke thinks the Australians made five mistakes during india tour)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या-चौथ्या कसोटीतही ऑस्ट्रेलियासाठी विजय कठीण! प्रमुख खेळाडूची मालिकेतून माघार
केएल राहुलला सोडावे लागले उपकर्णधारपद, रोहितकडून ‘या’ तिघांपैकी एकाला मिळणार मोठी जबाबदारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---