ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेविड वॉर्नर 2018 साली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना चेडूशी छेडछाड प्रकरणात दोशी आढळला होता. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाला मायदेशात दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका 17 डिसेंबर रोजी सुरू होणार असून, त्याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. आफ्रिकी संघाने चेंडूशी छेडछाड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर डेविड वॉर्नरला छेडण्याचा प्रयत्न करावा, असे मायकल क्लार्कला वाटते.
ऑस्ट्रेलिया संघ 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होता. उभय संघांतील कसोटी सामन्यादरम्यान स्टीव स्मिथ, डेविड वॉर्नर आणि कॅमरून बॅनक्रॉफ्ट यांना चेंडूशी छेडछाड करताना पकडले गेले होते. खेळाडूंना चेंडूला सॅडपेपरने घासण्याचा प्रयत्न केला असून, या प्रकरणाला ‘सॅनडपेपरगेट’ म्हणून सर्वजण जाणतात. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि सध्या समालोचकाची भूमिका पार पाडणाऱ्या मायकल क्लार्क (Michael Clarke) याला मात्र आफ्रिकी खेळाडूंना वॉर्नरला छेडण्याचा प्रयत्न करावा, असे वाटत आहे. आफ्रिकी खेळाडूंनी त्याला छेडण्याचा प्रयत्न केला, तर आश्चर्य वाटणार नाही, असे मायकल क्लार्क म्हटला.
माध्यमांवर बोलत असताना मायकल क्लार्क म्हणाला की, “मला वाटते की कोणताच दक्षिण आफ्रिकी खेळाडू, त्या ‘सॅडपेपरगेट’मध्ये सामील असलेल्या खेलाडूला लक्ष करण्याची संधी सोडणार नाही. पण त्यांनी मर्यादा ओलांडण्याची गरज नाहीये. ते वॉर्नरपुढे हे स्पष्ट करू शकतात की, ऑस्ट्रेलियन चाहत्यांना तो आवडत नाही. या कसोटी मालिकेत मला मैदानात वॉर्नरची स्लेजिंग होणाता पाहायचे आहे. मला पाहायचे आहे की, असे झाल्यावर तो मैदानात विरोधाकांवर तुटून पडोतो की नाही. जर असे झाले, तर मी म्हणेल डेवी (वॉर्नर) तुझ्या बुलडॉगच्या अवतारात पुन्हा ये आणि विरोधकांना तुझ्या बॅटने सडेतोड उत्तर दे.”
दरम्यान, 2018 साली ऑस्ट्रेलियन संघ चार सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला होता. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट यांनी चेंडूसी छेडछाड केली, जे कॅमेऱ्यात कैद झाली. हा प्रकार उघड झाल्यानंतर या तिघांवर देखील ऑस्ट्रेलिया क्रिकेटने वेगवेगळ्या कालावधीसाठी बंदी घातली होती. खेळाडूंची बंदी उढवली गेली मात्र, इतर दोघांच्या तुलनेत वॉर्नरला याचा अधिक तोटा झाल्याचे दिसते. या प्रकरणानंतर दोन वर्षांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथला कर्णधारपदाची संधी दिली, मात्र वॉर्नरवरील कर्णधारपदाची बंदी अद्याप उढवली गेली नाहीये. मागच्या काही महिन्यांमध्ये वॉर्नरवरील कर्णधारपदाच्या बंदीमुळे वातावरण तापलेले आपण पाहिले आहे. (Michael Clarke’s Big Statement on David Warner Ahead of Australia vs South Africa Test Series)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशचा कर्णधारही पहिल्या कसोटीला मुकणार? सामन्याच्या 24 तास आधी हॉस्पिटलमध्ये दाखल
केएल राहुलकडून विराट कोहलीवर स्तुतीसुमनांचा वर्षाव; म्हणाला की,’त्याची मानसिकता…’