इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या 2019 विश्वचषकात रविवारी(9 जून) भारताचा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या कमजोरीबद्दल ऑस्ट्रेलिया संघाला काहीही सांगणार नसल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज माइक हसीने स्पष्ट केले आहे.
हसी आयपीएलमध्ये धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाजी प्रशिक्षक आहे. त्यामुळे तो धोनीला जवळून ओळखतो. त्याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत धोनीच्या खेळाबद्दल ऑस्ट्रेलियन संघाला सल्ला देणार का असे विचारल्यावर सांगितले की ‘शक्यच नाही. तसही त्याच्या कमजोरी खूप कमी आहेत.’
हसी पुढे म्हणाला, ‘आता प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडूचे बारकाईने विश्लेषण करतात. त्यामुळे मला खात्री आहे त्यांच्याकडे धोनीसाठी आणि सर्व भारतीय खेळाडूंसाठी योजना असतील.’
तसेच हसी धोनीबद्दल म्हणाला, ‘तो एक चांगला प्रतिस्पर्धी आहे आणि विशेषत: दबावात तो कोणाहीपेक्षा जास्त संतुलित असतो. तो खूप हुशार खेळाडू आहे. त्याला त्याची ताकद माहित आहे आणि तो त्यानुसारच खेळतो.’
‘तो परिस्थितीनुसार खेळतो. पण त्याला त्याच्या खेळीच्या सुरुवातीला स्थिर व्हायला स्वत:ला वेळ द्यायला आवडते. धोनीला डावाच्या किंवा सामन्याच्या शेवटी जबाबदारी घ्यायला आवडते.’
याबरोबरच हसीने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या भारतासाठी महत्त्वाचे खेळाडू असल्याचे म्हटले आहे.
तसेच हसीने विश्वचषकातील संघाच्या कामगिरीबद्दल त्याचा अंदाज सांगताना म्हटले आहे की ‘मला वाटते हा सर्वोत्तम विश्वचषकांपैकी एक आहे. माझ्या अंदाजानुसार इंग्लड, भारत, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे अव्वल चार संघ असतील. पण मला असेही वाटते कदाचीत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडही पहिल्या चारमध्ये असू शकते.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–एनबीए फायनल्स आणि १-३ पिछाडीचा शाप!
–आयसीसी आपल्या निर्णयावर ठाम, धोनीला ‘बलिदान बॅज’ असलेले ग्लव्हज घालता येणार नाही






