अमेरिकेचा महान बास्केटबॉलपटू मायकल जॉर्डनने सामन्यादरम्यान वापरलेल्या ‘एअर जॉर्डन’ बूटांचा लिलाव करण्यात आला. या लिलावात जॉर्डनच्या बुटांना ५ लाख ६० हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास भारतीय रुपयांमध्ये ४ कोटींपेक्षा अधिक रुपये मिळाले आहेत. हा बास्केटबॉल बूटांच्या लिलावातील एक विक्रम आहे.
पांढऱ्या, काळ्या आणि लाल रंगाचे हे बूट जॉर्डनसाठी (Michael Jorden) १९८५मध्ये बनवण्यात आले होते. तसेच त्याने या बूटांवर ऑटोग्राफदेखील दिला आहे.
जॉर्डनच्या बूटांनी ‘मून शू’चा (Moon Shoe) विक्रम मोडला आहे. जो नाईकेच्या सुरुवातीलच्या बूटांपैकी एक आहे. सोथबीच्या जुलै २०१९च्या लिलावात ‘मून शू’ ४ लाख ३७ हजार डॉलर्समध्ये विकले गेले होते.
सोथबीने या बूटांसाठी एक लाख ते दीड लाखांपर्यंत विकण्याचा अंदाज लावला होता. परंतु लिलावादरम्यान बूटासाटी यापेक्षाही अधिक बोली लावण्यात आली होती.
एअर जॉर्डन वन बूटाचा पहिला मॉडेल होता. ज्याला नाईकेने विशेषत: जॉर्डनसाठी तयार केले होते. जॉर्डनने हे बूट एनबीएच्या आपल्या पहिल्या हंगामात घातले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-इंग्रजी बोलता न आलेल्या बाबर आझमने केला असा पलटवार
-बेन स्टोक्स म्हणतो, पराभवानंतर विराटने केली ही घाणेरडी गोष्ट
-एकाच वनडेत ओपनिंग गोलंदाजी व ओपनिंग फलंदाजी करणारे ५ भारतीय